भारताचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड बाबत आयसीसीने एक मोठी चूक केली होती. पण चाहत्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर आयसीसीने ती चूक सुधारली आहे.
झाले असे की आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हॉल ऑफ फेममध्ये समावेश असणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत राहुल द्रविडच्या नावापुढे तो डावकरी फलंदाज असल्याचे लिहिले होते. द्रविड हा उजव्या हाताचा फलंदाज आहे.
पण आयसीसीने त्याची माहिती लिहिताना तो डावकरी फलंदाज असल्याचे लिहिले होते. त्यामुळे चाहत्यांनी आयसीसीला ट्रोल केले.
पण ही चूक लक्षात येताच आयसीसीने लगेचच त्यांची चूक सुधारली आहे. त्यांनी द्रविडच्या नावा पुढिल डावकरी फलंदाज काढून आता उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज असे लिहिले आहे.
आयसीसीने सुधारली चूक –
द्रविडचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये मागीलवर्षी जूलैमध्ये समावेश करण्यात आला होता. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील होण्याचा सन्मान मिळवणारा तो केवळ पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.
आयसीसीने द्रविडबाबत केलेल्या चूकीनंतर चाहत्यांनी असे केले होते ट्रोल-
a kind request to @ICC to correct the following in Hall of Fame detail of the WALL 'Rahul Dravid'.
kind attention @BCCI pic.twitter.com/hBgEe5sYwI
— Gopal (@gopalgbhatt) September 20, 2019
Hey @ICC Hall of Famer Rahul Dravid is a right handed batsman please correct this error. pic.twitter.com/FDRBry1o8P
— Prashant Sharma (@the_wimpy_kid18) September 20, 2019
Rahul dravid is left hand batsman? last year he was inducted in Hall of Fame, but ICC may not aware about his batting style. 🙄😢 pic.twitter.com/rXgXq5xNkd
— mahesh vichare (@mvichareMT) September 19, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीच्या या फोटोची सोशल मीडियावर होत आहे जोरदार चर्चा
–टीम इंडियात रिषभ पंतची जागा घेऊ शकतात हे ३ यष्टीरक्षक, एमएसके प्रसाद यांचा खूलासा
–परदीप नरवालने तिसऱ्यांदा हे खास द्विशतक पूर्ण करत रचला इतिहास