मुंबई । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 ला दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची काल पहिली पुण्यतिथी होती, त्यानिमित्ताने अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहेत.1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले शास्त्री यांनी ट्विट केले की, “कायदेशीरदृष्ट्या हुशार आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे जेटली जी भारती क्रिकेटचा कायापालट होण्यासाठी मार्गदर्शक शक्ती होते”. शास्त्री यांनी जेटलींसोबतचे आपले काही निवडक फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार कपिल देवही दिसत आहेत.
Remembering #ArunJaitley Ji on his death anniversary today. Along with being legal luminary and a towering personality, Jaitley Ji was a guiding force in transforming #India pic.twitter.com/x2LliOarTR
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 24, 2020
प्रशिक्षक शास्त्री व्यतिरिक्त माजी भारतीय सलामीवीर आणि दिल्लीचा खासदार गौतम गंभीर यानेही जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. गंभीरने लिहिले की, “माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांनी आपल्या विचाराने प्रभावित होऊन राजकारणाद्वारे समाजसेवा सेवा करण्याचा निर्धार केला. सर आपली नेहमी आठवण येत राहील.”
“You can execute your ideas and intentions to serve people into actions, if you join politics”. These words by late Shri #ArunJaitley Ji will always be with me. His dedication to public service inspires millions like me. You will always be remembered sir! pic.twitter.com/i67dRmTeg3
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) August 24, 2020
अरुण जेटली यांचेही क्रिकेटविश्वाशी एक खास आत्मीयता होती. याखेरीज ते राजकारणी, उत्तम वक्ते आणि कायद्याचे जाणकार देखील होते. तसेच ते माजी अर्थमंत्री होते; त्याचबरोबर ते नेहमीच कुशल क्रिकेट प्रशासक म्हणून लक्षात राहतील. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) 13 वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी बीसीसीआयमध्ये व्यावसायिकतेची नवी क्रांती आणली. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही उपाध्यक्ष होते.
वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, आशिष नेहरा असे खेळाडू अजूनही मार्गदर्शक म्हणून त्यांची आठवण करतात. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानामुळे दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव अरुण जेटली स्टेडियम असे ठेवले गेले.