दुबई। मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने २ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो २० वर्षीय कार्तिक त्यागी. त्यामुळे त्याचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या सामन्यात राजस्थानने पंजाबला १८६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने १९ व्या षटकाच्या अखेरपर्यंत २ बाद १८२ धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात केवळ ४ धावांची अवश्यकता होती आणि खेळपट्टीवर एडेन मार्करम आणि निकोलस पूरन फलंदाजी करत होते. यावेळी कार्तिक त्यागीवर अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने सोपवली.
कार्तिकनेही ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्याने या षटकात केवळ १ धाव दिली आणि २ विकेट्स घेतल्या. अखेरच्या षटकात कार्तिकने पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर मार्करमने एक धाव घेतली. तर तिसऱ्या चेंडूवर पूरन बाद झाला. चौथा चेंडूही निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर दीपक हूडा बाद झाला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर ३ धावा हव्या असताना कार्तिकने हा चेंडूही निर्धाव टाकला. त्यामुळे राजस्थानने हा सामना २ धावांनी जिंकला.
या संपूर्ण सामन्यात कार्तिकने ४ षटके गोलंदाजी करताना २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्यागीचे कौतुक करताना लिहिले की ‘काय शानदार षटक होते कार्तिक त्यागी. दबावात शांत राहून आणि आपले काम चोख करणे, हे खूप चांगले होते, प्रभावित करणारे होते.’
What an over, #KartikTyagi! To maintain a cool head under that kind of pressure and to get the job done, great stuff, very impressive! #PBKSvRR #IPL2021
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) September 21, 2021
तसेच विरेंद्र सेहवागने म्हटले की ‘वाह! अखेरच्या षटकात ४ धावांचा बचाव करताना केवळ १ धाव दिली. कार्तिक त्यागीची शानदार गोलंदाजी. पंजाब केवळ स्वत:लाच दोष देऊ शकतात.’
Wow! Defending 4 in the final over, giving away only 1.
Brilliant from Kartik Tyagi. Punjab can only blame themselves #PBKSvRR— Virender Sehwag (@virendersehwag) September 21, 2021
याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेननेही कार्तिकचे कौतुक केले. त्याने लिहिले की ‘जवळपास आत्तापर्यंतचे सर्वोत्तम शेवटचे षटक (धावांचा बचाव करताना)! वाह.’
Close to the best last over (defending) ever! Wowza
— Dale Steyn (@DaleSteyn62) September 21, 2021
एवढेच नाही तर बॉलिवूड अभिनेता रनवीर सिंगनेही कार्तिकचे कौतुक करताना लिहिले की ‘म्हणून मला आयपीएल आवडते! एका क्षणात सामना पलटतो. वाह.’
This is why I love the IPL !!!!
Match turning on its head in a flash !!! Wow 🤩 #PBKSvRR— Ranveer Singh (@RanveerOfficial) September 21, 2021
याशिवाय देखील अनेक दिग्गजांनी कार्तिकचे कौतुक केले आहे.
An over for the ages from Kartik Tyagi! Defends 4 after the Fizz had delivered a 4 run over. Incredible finish. How could #PunjabKings mess this up!
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 21, 2021
Wat a game ! Well done Kartik tyagi 👌 https://t.co/JVHpokfYFP
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 21, 2021
That was world class stuff from Kartik Tyagi. Absolutely brilliant #PBKSvRR
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) September 21, 2021
Big moment for young Kartik Tyagi. To defend 4 in the final over when PBKS had only lost 2 wkts is unbelievable. Tyagi idolised Brett Lee growing up & the first few steps of his run-up are exactly like Lee.Impressed me with his 4-fer v Aus in U19 WC QF in 2020 @rajasthanroyals
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) September 21, 2021
Peeeche se aake dhappa?? Wowwww!It’s never over, NEVER OVER, till it’s over! #PBKSvRR
— Jatin Sapru (@jatinsapru) September 21, 2021
Oh dear, #PBKS and those familiar last over- last bowl finishes! #RRvPBKS #PBKSvsRR
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) September 21, 2021
This is what the @IPL is all about a great platform for Indian Youngsters Karthik Tyagi writes his own script today #PBKSvRR #IPL2021
— S.Badrinath (@s_badrinath) September 21, 2021
Superb last over 👌🏽
— Shai Hope (@shaidhope) September 21, 2021
Karthik Tyagi you beauty… #rr
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 21, 2021
That was just amazing from Kartik.👏
— Sandeep Lamichhane (@Sandeep25) September 21, 2021
Kartik Tyagi, what have you just done!
— Jake Lush McCrum (@JakeLushMcCrum) September 21, 2021
मयंकचे अर्धशतक व्यर्थ
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तसेच महिपाल लोमरोरने ४३ आणि एविन लुईने ३६ धावांची आक्रमक खेळी केली. तर, पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या, तर इशान पोरेल आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकांत ४ बाद १८३ धावाच करता आल्या. पंजाबकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ६७ धावा केल्या. तर, केएल राहुलने ४९ धावा केल्या. तसेच एडेन मार्करमने नाबाद २६ धावा केल्या आणि निकोलस पूरनने ३२ धावा केल्या. राजस्थानकडून कार्तिक त्यागीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच चेतन साकारिया आणि राहुल तेवातियाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टन्स इनिंगसह धोनी, विराट व रोहितला न जमलेली कामगिरी राहुलने दाखवली करून