मुंबई। गुरुवारी (२१ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. चेन्नईकडून माजी कर्णधार एमएस धोनी याने विजयी चौकार खेचला. यानंतर धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने तर धोनीने आंतरराष्ट्रीय निवृत्तीतून बाहेर यावे असे म्हणले आहे.
धोनीचा विजयी चौकार
या सामन्यात (CSK vs MI) मुंबईने चेन्नईसमोर १५६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, चेन्नईच्या फलंदाजांनी छोट्याखानी खेळी करत विकेट्स गमावल्या. तरी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकी भागीदारीने चेन्नईला सामन्यात कायम ठेवले. मात्र, रायुडू ४० आणि उथप्पा ३० धावा करून बाद झाले. त्यामुळे अखेरीस चेन्नई संकटात सापडली होती. मात्र, अखेरच्या काही षटकांत ड्वेन प्रीटोरियस आणि एमएस धोनीने विजय चेन्नईपासून फार दूर जाणार नाही, याची काळजी घेतली.
मात्र, शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज असताना जयदेव उनाडकटने या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रीटोरियसला २२ धावांवर बाद केले. नंतर दुसऱ्या चेंडूवर नवा फलंदाज ड्वेन ब्रावोने एक धाव घेत धोनीला स्ट्राईकवर आणले. पुढे धोनीने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार आणि चौकार ठोकत १० धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर दुहेरी धावा निघाल्या. त्यामुळे चेन्नईला अखेरच्या चेंडूवर ४ धावांची अवश्यकता होती. त्यावेळी धोनीने चौकार ठोकला आणि विजय मिळवू दिला.
धोनीने अखेरच्या चेंडूवर असा विजयी फटका मारण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा त्याने असा कारनामा करून दाखवला आहे. त्याचमुळे त्याला क्रिकेटमधील उत्तम फिनिशर म्हणून देखील ओळखले जाते. त्यातच धोनीने पुन्हा एकदा गुरुवारी त्याच्यातील फिनिशर अजूनही कायम असल्याची पावती दिल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
धोनीवर कौतुकाचा वर्षाव
धोनीचे अनेक आजी-माजी दिग्गजाकडून कौतुक करण्यात आले आहे (Cricket Fraternity Praises Finisher MS Dhoni). धोनीचा जुना सहकारी आणि माजी भारतीय क्रिकेटपटू आरपी सिंगने (RP Singh) ट्वीट केले की, ‘आपण धोनीला विनंती करू शकतो का की, त्याने टी२० विश्वचषकासाठी निवृत्तीतून बाहेर यावे.’ धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
https://twitter.com/rpsingh/status/1517201306309775360
तसेच माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मजेशीर ट्वीट केले की, ‘एमएस धोनी… ओम फिनिशाय नम:. काय सुंदर विजय होता. रोम्बा नल्ला.’
https://twitter.com/virendersehwag/status/1517200604116156417
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने ‘त्याचं नाव एमएस आहे’, असे ट्वीट केले आहे, तर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने ‘एमएसडी द फिनिशन’ असे ट्वीट केले आहे.
https://twitter.com/KP24/status/1517200666946523136
https://twitter.com/rashidkhan_19/status/1517200481050783744
अन्य क्रिकेटपटूंनीही धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला.
https://twitter.com/ImRaina/status/1517202670141943809
https://twitter.com/azharflicks/status/1517314100182745091
https://twitter.com/Sandeep25/status/1517212199915204608
https://twitter.com/MishiAmit/status/1517206608862134272
https://twitter.com/IrfanPathan/status/1517200816024612864
https://twitter.com/Mitch_Savage/status/1517330431976169481
https://twitter.com/parthiv9/status/1517206264597856256
https://twitter.com/iamsidkaul/status/1517202405859139584
मुंबईकडून चमकला तिलक वर्मा
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या होत्या. मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमारने ३२ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून मुकेश चौधरीने १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. नंतर चेन्नईने १५६ धावांचे आव्हान अखेरच्या चेंडूवर पूर्ण करत हंगामातील दुसरा विजय मिळवला. मात्र, मुंबईसाठी हा हंगामातील सलग सातवा पराभव ठरला. असा नकोसा विक्रम करणारा मुंबई पहिला संघ ठरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू पहिल्यांदा फलंदाजी म्हणाला ना’, जेव्हा रोहितने टॉसवेळी घेतली जडेजाची फिरकी
सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?
धोनीचा विजयी चौकार अन् कर्णधार जडेजा नतमस्तक, पाहा चेन्नई जिंकल्यानंतर काय झालं






