मुंबई। डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे गुरुवारी (२१ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३३ वा सामना झाला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर ३ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी, सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी दोन्ही संघांचे कर्णधार मस्ती करताना दिसले होते.
झाले असे की, सामन्यासाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) नाणेफेकीसाठी मैदानात आले. त्यावेळी रोहितने नाणे उडवले, तर जडेजाने कॉल दिला. यावेळी जडेजाचा कॉल बरोबर आल्याने त्याने नाणेफेक जिंकून चेन्नई प्रथम गोलंदाजी करण्यार असल्याचा निर्णय सांगितला.
हा निर्णय सांगितल्यानंतर जेव्हा तो पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा रोहितने त्याला थांबवले आणि त्याला म्हणाला, ‘तू प्रथम फलंदाजी करणार असे सांगितले ना.’ त्यावर जडेजाने हसत उत्तर दिलेस की, ‘नाही, मी गोलंदाजीच सांगितली.’ यावेळी सर्वजण हसायला लागले. हा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (IPL 2022: Rohit Sharma And Ravindra Jadeja Engage In A Hilarious Banter at the toss).
https://twitter.com/SlipDiving/status/1517143759389007876
खरंतर जडेजा आणि रोहित गेली अनेक वर्षांपासून भारतीय संघाकडून एकत्र खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्रीही आहे.
https://twitter.com/Biscuit8Chai/status/1517146848712347648
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
चेन्नईने जिंकला रोमांचक सामना
नाणेफेकीवेळी जरी ही मस्ती झाली असली, तरी सामन्यादरम्यान दोन्ही संघांत चांगलीच टशन पाहायला मिळाली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमारने ३२ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून मुकेश चौधरीने १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईकडून अंबाती रायुडूने ४० धावांची आणि रॉबिन उथप्पाने ३० धावांची खेळी केली. तसेच अखेरीस ड्वेन प्रीटोरियसने २२ आणि धोनीने नाबाद २८ धावा करत चेन्नईला विजयापर्यंत पोहचवले. अखेरच्या षटकांत चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. यावेळी एकट्या धोनीनेच त्यातील १६ धावा काढत चेन्नईला विजय मिळवून दिला. मुंबईकडून डॅनिएल सॅम्सने ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचा विजयी चौकार अन् कर्णधार जडेजा नतमस्तक, पाहा चेन्नई जिंकल्यानंतर काय झालं
जेव्हा बरोबर २४ वर्षांपूर्वी शारजाहच्या मैदानावर अवतरले होते ‘सचिन’ नावाचे तुफान
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत चेन्नईची टर उडवणारा ‘हा’ पठ्ठ्या आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर