चेन्नई| एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. पहिलाच दिवस भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दिडशतकी खेळी करत गाजवला आहे. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या सामन्यात रोहितने भारताच्या पहिल्या डावात सुरुवातीला आक्रमक खेळताना आणि नंतर भारताचा डाव सांभाळत शानदार दिडशतकी खेळी साकारली. रोहितने १३० चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर पुढील ७८ चेंडूत १५० धावांचा टप्पाही पार केला. मात्र, दिडशतक करुन तो लगेचच बाद झाला. त्याने या डावात एकूण २३१ चेंडूत १६१ धावा केल्या. यात त्याने १८ चौकार आणि २ षटकार मारले.
रोहितचे हे कसोटी क्रिकेटमधील एकूण सातवे शतक आहे. त्यातील चार वेळा त्याने दिडशतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीनंतर इरफान पठाण या भारताच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूने कौतुक करताना म्हटले आहे की ‘पुन्हा एकदा सांगतोय, रोहित विशेष खेळाडू आहे.’
Let’s repeat @ImRo45 is a special player!
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 13, 2021
केवळ इरफानच नाही तर रोहितचे अनेक आजी-माजी दिग्गजांनी कौतुक केले आहे. भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले आहे की ‘रोहित मस्त खेळलास. आव्हानात्मक परिस्थितीत समाधान देणारे शतक होते. फलंदाजीसाठी कठीण खेळपट्टीवर सकारात्मक दृष्टीकोन आणि पायांच्या हलचालींचे महत्त्व दाखवून दिलेस.’
Well played @ImRo45 One of most satisfying century in challenging conditions. Also shows the importance of positive intent, decisive footwork when batting on a tough pitch. Now convert this into a biggie. #INDvsENG #class #elegance @StarSportsIndia pic.twitter.com/h9yGqmKJvs
— VVS Laxman (@VVSLaxman281) February 13, 2021
याबरोबर खलील अहमदने रोहितने शतक पूर्ण करण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Finally got his deserving hundred 🇮🇳 proud of you bro @ImRo45 long way to go, make it double,triple 🤞🏽 #INDvsENG #hitmanshow pic.twitter.com/ldKPJ2Hjw1
— Khaleel Ahmed 🇮🇳 (@imK_Ahmed13) February 13, 2021
तसेच हरभजन सिंगने रोहितचे कौतुक करताना त्याला अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणत, त्याचे शतक शानदार होते, असे ट्विट केले आहे.
Top class @ImRo45 you are a beauty. Brilliant 100 #INDvsENG
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 13, 2021
अन्य काही खेळाडूंनीही केले रोहितचे कौतुक –
Another great knock by my brother @ImRo45 , always making a mark on the field. All the best, hope to see you soon🙌 #INDvENG #GoHitman #Goals 🏏
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) February 13, 2021
What a knock 💯🇮🇳💪🔥@ImRo45 #INDvsENG
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) February 13, 2021
What an amazing innings from the graceful and elegant @ImRo45 ! Such class, love watching him bat 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
— Shane Warne (@ShaneWarne) February 13, 2021
त्याचबरोबर मुंबई इंडियन्स या आयपीएल संघानेही रोहितच्या शतकाचे कौतुक करणारे काही ट्विट्स केले आहेत.
https://t.co/RYM1O69v2f pic.twitter.com/gMfsfuDoGr
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2021
Fourth 1️⃣5️⃣0️⃣ plus score for Rohit in Tests 🤩#OneFamily #MumbaiIndians #INDvENG
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2021
Ro welcoming the crowd back at Chepauk with a sensational ton 💪#OneFamily #MumbaiIndians #INDvENGpic.twitter.com/LYmago7LXk
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2021
गावसकरांना टाकले मागे –
रोहितचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलामीवीर म्हणून खेळताना हे ३५ वे शतक आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारा तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना सुनील गावसकरांच्या सलामीवीर म्हणून केलेल्या ३४ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ४५ शतकांसह सचिन तेंडुलकर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ३६ शतकांसह विरेंद्र सेहवाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Valentines Week Special : ५ वर्षे भारताच्या स्टार खेळाडूच्या अफेअरची कुणालाच नव्हती माहिती
तूच माझा व्हॅलेंटाईन! दुसर्या कसोटी सामन्यावर रहाणेचं आहे विशेष प्रेम, तुम्हीच पाहा अजब आकडेवारी