---Advertisement---

‘विशेष कारकीर्द अन् दिग्गज!’ रोहित, विराट ते डू प्लेसिसपर्यंत, डिविलियर्सच्या निवृत्तीबद्दल आजी-माजी खेळाडू व्यक्त

On: शनिवार, नोव्हेंबर 20, 2021 5:57 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करत त्याच्या निर्णय घोषित केला. त्याने हा निर्णय घोषित केल्यानंतर क्रिकेटविश्वातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या.

डिविलियर्सने निवृत्तीची घोषणा करताना ट्वीट केले की, ‘हा खूप अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने खेळलो. आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. ज्योत आता तितकी तेजस्वीपण जळत नाहीये.’

https://twitter.com/ABdeVilliers17/status/1461590034193297409

डिविलियर्स त्याच्या चौफेर फटकेबाजीमुळे ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या अनोख्या फलंदाजी शैलीने अनेकांची मनं जिंकली आणि त्याचबरोबर मोठमोठे विक्रमही केले. वनडेत केवळ ३१ चेंडूत शतक करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

खरंतर डिविलियर्सने तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण, त्याने जगभरातील विविध लीग स्पर्धांमध्ये खेळणे सुरू ठेवले होते. तो नुकताच आयपीएल २०२१ हंगामात देखील खेळताना दिसला होता. पण, आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वातून ‘एका युगाचा अंत’, ‘एका महान खेळाडूची निवृत्ती’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारताचा कर्णधार आणि डिविलियर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील सहकारी विराट कोहलीने लिहिले की ‘आमच्या वेळच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि मला भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वात प्रेरणादायी असलेल्या व्यक्तीस, तू जे काही कमावले आहेस त्याचा तुझ्यासहित सर्वांना सार्थ अभिमान राहिल. तू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी जे काही केले आहेस, ते सदैव आमच्या स्मरणात राहिल. फक्त क्रिकेटपुरतेच आपले नाते मर्यादित नव्हते आणि पुढेही ते असेच कायम राहिल.’

विराटने पुढे लिहिले की, ‘तुझ्या या निर्णयामुळे मला खूप दु:ख होते आहे. परंतु मला माहिती आहे, तू घेतलेला हा निर्णय तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी योग्य असेल. आय लव्ह यू.’ विराटच्या ट्वीटवर एबी डिविलियर्सने उत्तर देताना लिहिले की, ‘लव्ह यू टू भावा’

https://twitter.com/imVkohli/status/1461610968039899137

तसेच भारताचा टी२० कर्णधार रोहित शर्माने डिविलियर्सच्या निवृत्तीबद्दल ट्वीट केले की, ‘खूप लोकांना एबीप्रमाणे खेळावर छाप पाडता येत नाही. समोरुन त्याला खेळताना पाहाणे खरंच आनंद देणारे आहे. एबी तुला निवृत्तीबद्दल शुभेच्छा.’

https://twitter.com/ImRo45/status/1461935322674069504

याशिवाय एबी डिविलियर्सचा शाळेपासूनचा मित्र आणि संघसहकारी फाफ डू प्लेसिसनेही भावुक ट्विट केले. त्याने लिहिले की ‘एबी डिविलियर्स तुझ्या विशेष कारकिर्दीबद्दल कौतुक. तुझ्याबरोबर क्रिकेटच्या मैदानावर खेळल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुझ्याशिवाय क्रिकेट पहिल्यासारखे राहणार नाही. महान खेळाडू, ज्याच्याबरोबर मी खेळलो.’

डू प्लेसिसच्या या ट्वीटला उत्तर देताना डिविलियर्सने आफ्रिकन भाषेत लिहिले की ‘वाह डूप! माझ्या मित्रा, तुझेही कौतुक, आपण एकत्र खूप दूरपर्यंत आलो.’

https://twitter.com/faf1307/status/1461621770352529414

याशिवाय देखील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत डिविलियर्सला निवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/ivivianrichards/status/1461673372807356426

https://twitter.com/henrygayle/status/1461644754798665729

https://twitter.com/ashwinravi99/status/1461998739061559304

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1461678223465451522

https://twitter.com/Jaspritbumrah93/status/1461676470586130434

https://twitter.com/KrisSrikkanth/status/1461672246628392963

https://twitter.com/y_umesh/status/1461671566794584068

https://twitter.com/cheteshwar1/status/1461648518347575298

https://twitter.com/DineshKarthik/status/1461609676391346177

https://twitter.com/SDhawan25/status/1461607098286952448

https://twitter.com/ShreyasIyer15/status/1461593511057264645

https://twitter.com/Mujeeb_R88/status/1461672855679209484

https://twitter.com/Gmaxi_32/status/1461611422220124160

https://twitter.com/josbuttler/status/1461608245907255297

https://twitter.com/surya_14kumar/status/1462001613619355648

https://twitter.com/ShaneRWatson33/status/1461648045305589762

https://twitter.com/MohammadNabi007/status/1461644650364739585

https://twitter.com/rashidkhan_19/status/1461628546401673220

डिविलियर्सची कारकिर्द –
एबी डीविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा, तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

तसेच तो त्याच्या कारकिर्दीत एकूण ३४० टी२० सामने खेळला आहे. यात १८४ आयपीएल सामन्यांचाही समावेश आहे. त्याने टी२० कारकिर्दीत ९४२४ धावा केल्या आहेत. यामध्ये आयपीएलमधील त्याच्या ५१६२ धावांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हसन अलीची साडेसाती सुरूच! विश्वचषकात ‘विलन’ ठरल्यानंतर आता आयसीसीची कारवाई

थरूर यांनी प्रत्यक्षात पाहिली रोहितच्या नेतृत्त्वाची कमाल, तरीही कोलकाता टी२०त कर्णधार बदलण्याची केली मागणी

एबीचा पर्याय म्हणून या तीन खेळाडूंवर असेल आरसीबीची नजर; सर्वांनी गाजवलेत विश्वचषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---