---Advertisement---

सामना हारुनही दिल्लीनं जिंकली मनं! क्रिकेटविश्वातून अशा उमटल्या प्रतिक्रिया

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 3:16 AM
---Advertisement---

शारजाह। बुधवारी (१३ ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये आणखी एक रोमांचकारी सामना पाहायला मिळाला. शारजाह क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या क्वालिफायर २ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सवर मात केली आणि अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. या सामन्यानंतर क्रिकेट विश्वातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

या सामन्यात दिल्लीने कोलकातासमोर १३६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने  १९.५ षटकात ७ विकेट्स गमावत पूर्ण केला. विशेष म्हणजे कोलकाताने या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या जोडीने ९६ धावांची सलामी दिली होती. अय्यरने ५५ धावा केल्या आणि गिलने ४६ धावा केल्या. तसेच १६ व्या षटकापर्यंत कोलकाताने २ बाद १२३ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना कोलकाता सहज जिंकेल असे वाटत होते.

मात्र, अखेरच्या ४ षटकात दिल्लीकडून अवेश खान, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए आणि आर अश्विनने केलेल्या गोलंदाजीने सर्वांचीच मनं जिंकली. या चौघांनी मिळून अखेरच्या ४ षटकात कोलकाताचे ५ खेळाडू बाद केले. त्यामुळे कोलकातासाठी २४ चेंडूत १३ धावा अशा समीकरणावरुन हा सामना २ चेंडूत ६ धावा अशी समीकरणापर्यंत बदलला. मात्र, अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने आर अश्विनविरुद्ध षटकार ठोकला आणि कोलकाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

क्रिकेट विश्वातून प्रतिक्रियांचा पाऊस
या सामन्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी म्हटलंय ‘मी सांगितलं होतं, मॉर्गन या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाईल.’

https://twitter.com/MichaelVaughan/status/1448343962704662532

तसेच युवराज सिंगने ट्विट केले की ‘मला क्रिकेट फक्त आवडत नाही, तर माझं त्याच्यावर प्रेम आहे. काय सामना होता! कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात पोहोचल्याबद्दल अभिनंदन. रिषभ पंत आणि त्याच्या संघातील खेळाडूंबद्दल वाईट वाटलं. पण, हा खेळ आहे आणि यात एकच विजेता असतो.’

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1448346267889790977

तसेच आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यातून माघार घेतलेला कोलकाता संघातील वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ट्विट केले की कोलकाता आता केवळ एक सामना बाकी आहे.

https://twitter.com/patcummins30/status/1448345770680328198

याव्यतिरिक्त देखील क्रिकेट विश्वातील अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कोलकाताचे अभिनंदन करताना दिल्लीने दिलेल्या कडव्या लढतीचे कौतुक केले आहे.

https://twitter.com/bhogleharsha/status/1448344227944058887

https://twitter.com/WasimJaffer14/status/1448332701522534401

https://twitter.com/virendersehwag/status/1448344851150372866

https://twitter.com/DelhiCapitals/status/1448355579882213378

https://twitter.com/mukundabhinav/status/1448347000785682439

https://twitter.com/imkuldeep18/status/1448349920960794625

https://twitter.com/AlexHartley93/status/1448344327596412935

https://twitter.com/MadanLal1983/status/1448345343444148228

https://twitter.com/IrfanPathan/status/1448344715489787904

https://twitter.com/hemangkbadani/status/1448348292279009280

https://twitter.com/grantelliottnz/status/1448344871819907074

https://twitter.com/niallnobiobrien/status/1448344753507119106

https://twitter.com/IamDimuth/status/1448346426828726280

https://twitter.com/cricketaakash/status/1448349175289053185

कोलकाताच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी
या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत दिल्लीला २० षटकांत ५ बाद १३५ धावांवर रोखले होते. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावा केल्या. अन्य फलंदाजांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

सात धावासांठी तीन विकेट्सची आहुती! अखेर गगनचुंबी षटकार ठोकत कोलकाताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

दोन ‘पुणेकर’ खेळाडू दिल्लीला पडले भारी, प्लेऑफमध्ये पराभवाला ठरले कारणीभूत, पाहा कामगिरी

Photo: शेवटच्या षटकात पराभूत झाल्यानंतर दिल्लीच्या ताफ्यात निराशेची लहर; पृथ्वी शॉ तर ढसाढसा रडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---