---Advertisement---

तेंडुलकर ते सेहवाग; क्रिकेटविश्वातून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव

On: शनिवार, ऑगस्ट 7, 2021 6:45 PM
---Advertisement---

संपूर्ण भारतासाठी शनिवार सोनियाचा दिवस ठरला आहे. भारताचा स्टार भालाभेकपटू नीरज चोप्राने टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याबरोबरच त्याने इतिहास घडवला आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही सुवर्णपदकाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.

भारताचे सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर, युवराज सिंग अशा अनेक क्रिकेटपटूंनी नीरजचे कौतुक करणारे ट्विट केले आहेत. तसेच बीसीसीआयनेही नीरजचे अभिनंदन करताना ट्विट केले आहे की ‘ऐतिहासिक! नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणे, हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. नीरज सलाम.

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज भारताचा दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी नेमबाज अभिनव बिंद्राने बिजिंग ऑलिंपिक २००८ स्पर्धेत १० मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तसेच नीरज ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ऍथलीट देखील ठरला आहे.

 

अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मिस्टर भालाफेक करून नीरजने अंतिम फेरीसाठी पात्र मिळवले होते. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.

अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय

शाकिब अल हसनचा अद्भुत विक्रम; टी२०त ‘अशी’ कामगिरी करणारा बनला जगातील पहिला क्रिकेटपटू

श्रीलंका टू इंडिया, कोरोनामुक्त झाल्यानंतर चहल अन् गौतम सुखरुप परतले मायदेशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---