हार्दिक पांड्याला टी20 क्रिकेटमधील भारतीय संघाचा पुढचा कर्णधार म्हणून पाहिले जात होते. टीम मॅनेजमेंटने देखील भारतीय संघाची पूर्नबांधणी त्यापध्दतीनेच केले होते. त्याचप्रमाणे यंदाच्या टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्याला उपकर्णधाराची जबाबदारी दिले होते. पांड्याने देखील लाैकिसास साजेल अशी कामगिरी केला होता. हार्दिकने टीम इंडिया विश्वविजेता बनण्यासाठी मोलाचे योगदान दिला होता. आश्या परिस्थितीत हार्दिक पांड्याला डावलून सूर्यकुमार यादवला संघाचे कर्णधार म्हणून बघितले जात आहे. वृत्त अहवालानुसार, आगामी श्रीलंका दाैऱ्यासाठी आणि टीम इंडियाच्या टी20 मध्ये नियमीत कर्णधारम्हणून सूर्यकुमार यादवची चर्चा होत आहे.
वास्तविक, हार्दिक पांड्याचा फिटनेस आणि उपलब्धता हे त्याला कर्णधार न बनवण्यामागे सर्वात मोठे कारण असल्याचे दिसते. हार्दिकच्या खराब फिटनेस रेकॉर्डमुळे त्याच्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. तर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हार्दिक पांड्या नव्हे तर सूर्यकुमार यादवला टी20 टीमचा पुढचा कर्णधार बनवण्यात येईल.
एकीकडे हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, दरम्यान, त्याने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याने त्याच्या फिटनेसबद्दल सांगितले आहे. वास्तविक, हार्दिकने सांगितले की 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर पुनरागमनाचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. हार्दिकने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक अनफिट दिसत आहे. हार्दिकचे पोट दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रात हार्दिकची शरीरयष्टी पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले की, “2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गंभीर दुखापतीनंतर, प्रवास कठीण होता, परंतु टी20 विश्वचषकातील विजयासह प्रयत्न यशस्वी झाले. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल, तोपर्यंत निकाल येणारच. कठीण. परिश्रम व्यर्थ जात नाही.” चला आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करूया आणि आपल्या फिटनेसवर काम करूया.”
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरले नाही बीसीसीआय! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत ‘या’ देशात खेळणार सामने
कर्णधारपदाबाबत नवा ट्विस्ट! सूर्या-हार्दिकच्या मध्ये रोहित शर्माची मध्यस्थी, म्हणाला…
18 वर्षाच्या गोलंदाजापुढे बाबर आझम ढेपाळला, पाहा व्हिडिओ