भारताप्रमाणेच जगभरातही क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. आता याच क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खेळांचा महाकुंभमेळा म्हणजेच लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेट या खेळाचाही समावेश केला जाणार असल्याचे वृत्त समोर आले होते. आता या दाव्याला अजूनच बळकटी मिळाली असून, लवकरच याबाबतची घोषणा होईल.
काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 (Los Angeles Olympics 2028) महाकुंभमेळ्यात क्रिकेट (Los Angeles Olympics 2028) खेळाचा समावेश केला जाईल. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये अखेरचा समावेश 1900मध्ये केला गेला होता. आता 128 वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतत आहे. मात्र, अद्याप ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीये. तरीही असे म्हटले जात आहे की, या आठवड्याच्या अखेरीस 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक होणार असून यामध्ये याबाबत अधिकृत घोषणा होईल. त्या आधीच आता कोणते खेळ समाविष्ट करायचे याबाबत आयोजकांचा निर्णय झाल्याचे समजते. ऑलिम्पिक कार्यकारी समितीने क्रिकेटसाठी होकार दर्शवला असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
ऑलिम्पिकचे आयोजन करणाऱ्या देशाला प्रत्येक वेळी पाच नव्या खेळांचा या स्पर्धेत समावेश करण्याची परवानगी असते. त्यामुळे अमेरिका यावेळी अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ असलेला बेसबॉल, क्रिकेट, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस व स्क्वॅश यांचा समावेश करेल.
सध्या अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वेगाने वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच मेजर लीग क्रिकेट ही मोठी स्पर्धा अमेरिकेत पार पडली होती. तसेच अमेरिकेसाठी काही इतर देशातील बडे खेळाडू देखील खेळताना दिसतात. भारतीय उपखंडातील लोकांना ऑलिम्पिककडे आकर्षित करण्यासाठी अमेरिका क्रिकेटचा समावेश करत असल्याचे बोलले जातेय.
(CRICKET HAS BEEN APPROVED BY IOC EXECUTIVE BOARD FOR 2028 OLYMPICS)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका सामन्यात गोंधळ! मार्कस स्टॉयनिस आणि स्टीव स्मिथच्या विकेटमुळे वाद
IND vs PAK सामन्यापूर्वी होणार भव्य सोहळा, प्रसिद्ध बॉलीवूड गायक दाखवणार आपल्या आवाजाची जादू