युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने गेल्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपली छाप सो़डली आहे.
या चहल-कुलदीप जोडीने अश्विन-जडेजा या भरताच्या दिग्गजांची मर्यादित षटकांच्या सामन्यातील जागा अक्षरशः हिरावून घेतली आहे असे म्हणावे लागेल.
भारताच्या युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गेल्या एक वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव सांगितला.
यामध्ये चहलने माजी कर्णधार एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांच्याबद्दलच्या भावना देखिल व्यक्त केल्या.
” मी आणि कुलदीप दहा षटकानंतर जेव्हा गोलंदाजीला येतो, तोपर्यंत धोनीने खेळपट्टीचा रंग ओळखलेला असतो. तसेच फलंदाजाच्या डोक्यात काय विचार चालू आहेत याचा विचार करून आम्हाला कशी गोलंदाजी करावी याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन धोनी करतो. यामुळे आम्हाला गोलंदाजी करणे सोपे होते.” चहलने धोनीविषयी या भावना व्यक्त केल्या.
तर विराट कोहलीबद्दल बोलताना तो म्हणाला, ” विराट कायम सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन असतो आणि तो गोलंदाजांवर पूर्ण विश्वास ठेवतो. यामुळे आमच्यावर गोलंदाजी करताना दबाव येत नाही.”
चहलने भारतासाठी 23 एकदिवसीय सामन्यात 43 बळी तर 21 टी-20 सामन्यात 35 बळी मिळवले आहेत.
तसेच गेल्या तीन ते चार वर्षांपासून चहलची आयपीयलमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–संपूर्ण यादी: पुढील पाच वर्षांचे भारतीय संघाचे वेळापत्रक घोषित
–आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा






