भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या संघाचा नियमित सदस्य बनला आहे. पंत आयपीएल २०२२ मध्ये प्रभाव पाडू शकला नव्हता, पण इंग्लंड दौऱ्यात त्याने जोरदार पुनरागमन केले. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात पंत भारतासाठी खेळणार, हे निश्चित मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने एक प्रोमो शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओसोबत एक दमदार कॅप्शनही दिले गेले आहे.
आयसीसीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जे लिहिले आहे, त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. पंतवर अनेकदा त्याच्या खराब प्रदर्शनावरून टीका केली गेली आहे. पण इंग्लंड दौऱ्यात त्याने ज्या पद्धतीची फलंदाजी केली, त्याच्या जोरावर भारतीय संघ कसोटी सामन्यात मोठे लक्ष्य उभे करू शकला. आयसीसीने पंतचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, “वेलकम टू बिग टाइम, रिषभ पंत.” हे कॅप्शन पाहून असेच दिसते की, आयसीसीने देखील मान्य केले आहे की, आता पंतची वेळ आली आहे.
https://www.instagram.com/p/Cf0X43JqJAb/?utm_source=ig_web_copy_link
आयसीसीच्या या व्हिडिओत दिसत आहे की, एक हेलिकॉप्टर सिडनीच्या ओपेरा हाऊसच्यावरून उडत आहे. तेवढ्यात सिडनी हार्बरच्या आतमधून रिषभ पंतची एक मोठी मूर्ती बाहेर येते. पंत खेळपट्टीवर जाताना ज्या पद्धतीने बॅट आणि हेलमेट घालून जात असतो, त्याच पद्धतीने व्हिडिओतही दिसत आहे. त्यांची उंची एखाद्या मोठ्या गॉडजिलाप्रमाणे दाखवली गेली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या १ ते ५ जुलैदरम्यान खेळल्या गेलल्या कसोटी सामन्यात पंतने जबरदस्त प्रदर्शन केले. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने शतक ठोकले, तर दुसऱ्या डावात अर्धशतक साकारू शकला. असे असले तरी, सामन्याच्या शेवटच्या डावात इंग्लंडसाठी जॉनी बेयरस्टो आणि जो रुट यांनी शतक ठोकले आणि स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला. हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील बरोबरीत सोडवली, जी मागच्या वर्षी सुरू झाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
SLvsAUS Test: दिनेश ऍण्ड रमेश ऑन द क्रिज, चंडिमलच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला टाकले बॅकफूटवर
जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी भिडणार भारतीय खेळाडू, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगणार थरार
SLvsAUS: आधी गोलंदाज आता फलंदाज ठरतायेत ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक, ४ श्रीलंकन खेळाडूंनी केली अर्धशतके






