---Advertisement---

ऑस्ट्रेलियाची ही खेळाडू म्हणते, मला भारताविरुद्ध खेळण्याचा तिरस्कार वाटतो, कारण…

On: शनिवार, मार्च 7, 2020 10:51 AM
---Advertisement---

रविवारी (8 मार्च) मेलबर्न (Melbourne) येथे भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध (Indian Women vs Australian Women) आयसीसी टी20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळणार आहे. यावेळी भारतासमोर 4 वेळा विश्ववजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे तगडे आव्हान असणार आहे.

या विश्वचषकातील पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातच पार पडला होता. हा सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केले होते आणि आता अंतिम सामनाही या दोन संघात होत आहे.

विश्वचषकातील अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची वेगवान गोलंदाज मेगन शटने (Megan Schutt) म्हटले आहे की भारतीय संघ तिच्याविरुद्ध चांगला खेळत असल्याने तिला भारतीय संघाविरुद्ध खेळायला आवडत नाही.

“मला भारताविरुद्ध खेळण्याचा तिरस्कार वाटतो. भारतीय खेळाडूंना माझ्यामुळे खूप फायदा होतो. स्म्रीती मंधना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) माझ्या गोलंदाजीवर चांगल्या प्रकारे खेळतात. विश्वचषकापूर्वी तिरंगी मालिकेत शेफालीने माझ्या चेंडूवर मोठा षटकार मारला होता. तसा षटकार आजपर्यंत माझ्या गोलंदाजीवर कोणालाही मारता आला नव्हता,” असे आयसीसीशी बोलताना मेगन म्हणाली.

पुढे मेगन म्हणाली की, ती भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी विशेष तयारी करत आहे. परंतु, तिला पावर प्लेमध्ये भारतीय संघाच्या जोडीचा सामना करायचा नाही.

“नक्कीच आम्ही भारतीय फलंदाजांविरुद्ध रणनीती बनविली आहे. परंतु मी पावर प्लेमध्ये त्यांचा सामना करण्यासाठी तयार नाही. शेफाली आणि स्म्रीती माझ्या गोलंंदाजीवर अगदी सहजपणे खेळतात,” असे मेगन यावेळी म्हणाली.

अंतिम सामन्याबद्दल बोलताना मेगन म्हणाली की, भारताला सामोरे जाणे हे एक मोठे आव्हान आहे. “आम्ही त्या अंतिम टप्प्यात आहोत ज्याबद्दल आम्ही बर्‍याच दिवसांपासून बोलत आहोत. भारताविरुद्धच्या सामन्यात तिरंगी मालिका लक्षात घेता तो (भारतीय संघ) आमच्यासाठी फीट होता. परंतु, आमच्यासाठी हे खरोखर मोठे आव्हान असू शकत नाही,” असेही मेगन यावेळी बोलली.

ही खरोखर वाईट गोष्ट नाही. आम्ही नुकत्याच खेळलेल्या भारतीय संघाविरुद्ध सामना करणार आहोत. हे चांगले आहे. त्याचबरोबर हे त्यांच्यासाठीही सारखेच असणार आहे,” असेही मेगन पुढे म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या- 

निवड समितीच्या नवीन अध्यक्षाचे विराटशी असलेले हे जुने नाते माहित आहे का?

निवड समितीत ‘या’ खेळाडूचाही होऊ शकतो समावेश; सौरव गांगुली इशारा…

-असं काय केलं की एकाच संघातील ते दोघेही ठरले सामनावीर पुरस्कारचे मानकरी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---