सध्या इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. १९९८ मध्ये पहिल्या व अखेरच्या वेळी पुरुष क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत खेळले गेले होते. आता क्रिकेटला आणखी मोठ्या स्तरावर नेण्याकरता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कंबर कसली असून, ऑलिम्पिकमध्येही क्रिकेट दिसू शकते.
अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. प्रत्येक ऑलिम्पिक आयोजकांना दरवेळी आपल्या पसंतीचे काही खेळ समाविष्ट करण्याची संधी असते. याच कारणाने लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या खेळांसाठी क्रिकेटचे नाव शॉर्टलिस्ट केले गेले असल्याचे सांगण्यात येते. आता आयसीसी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर यासाठी प्रेझेंटेशन देऊ शकते. त्यासाठी ऑलिम्पिक समितीने त्यांना निमंत्रण पाठवणे आवश्यक आहे.
टोकियो ऑलिम्पिकनंतर, क्रिकेट चाहत्यांकडून अशी मागणी करण्यात आली होती की, भारतीय उपखंडात मोठा चाहतावर्ग असलेल्या क्रिकेटलाही ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी करून घेण्याची विनंती केली पाहिजे. आयसीसीच्या काही उच्च अधिकार्यांनी देखील या कल्पनेला पाठिंबा दिला होता. त्याचवेळी काहींनी या कल्पनेला विरोध देखील दर्शविलेला. सध्या क्रिकेटपटूंचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे आणि भविष्यात आणखी लीग वाढल्यास त्याचा परिणाम खेळाडूंवर होईल असे त्यांनी म्हटलेले. तसेच, क्रिकेट हा जगातील मोजक्या देशांमध्ये खेळला जात असल्याने त्याला आयओसी ऑलिम्पिक प्रवेशाची मान्यता देते का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यास मान्यता मिळाल्यास, प्रत्येक क्रिकेट बोर्ड त्यांचे दुय्यम दर्जाचे किंवा कनिष्ठ खेळाडूंचे संघ या स्पर्धेसाठी पाठवतात का हे पाहणे रंजक ठरेल. ऑलिम्पिकसाठी फुटबॉल संघात मुख्यत्वे युवा फुटबॉलपटूंचा समावेश असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी
तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक






