भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर टी20 मालिका खेळण्यासाठी (22 जुलै) रोजी श्रीलंकेत दाखल झाला आहे. टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सुर्यकुमारकडे (Suryakumar Yadav) आहे. भारत श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारत रोहितच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी भारताचा माजी खेळाडू राॅबिन उथप्पानं संजू सॅमसनबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. त्यामध्ये टी20 साठी संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान दिलं आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे राॅबिन उथप्पानं (Robin Uthappa) सोनी स्पोर्टशी बोलताना संजू सॅमसनबाबत (Sanju Samon) मोठं वक्तव्य केलं आहे.
सोनी स्पोर्टशी बोलताना राॅबिन उथप्पा (Robin Uthappa) म्हणाला, “संजूच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, तो यातून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. एक खेळाडू म्हणून त्याची ही शेवटची वेळ असेल असं मला वाटत नाही, परंतू संजूची एकदिवसीय क्रिकेटची आकडेवारी खूपच अविश्वसनीय आहे. मला वाटतं की एकदा नेतृत्वाच्या गोष्टी मिटल्या की, भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आणि समर्थक म्हणून आम्हाला शांत राहावे लागेल.”
पुढे बोलताना उथप्पा म्हणाला, “मला वाटतं की संजू इतर खेळाडूंप्रमाणे एकदिवसीय संघाच्या शर्यतीतून बाहेर नाही. ही वेळ आहे ती नक्की बदलेल आणि त्याला भारतीय संघात संधी मिळेल, परंतू जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्याला त्या संधीचा फायदा घ्यावा लागेल आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचं स्थान पक्के करावे लागेल.”
संजू सॅमसननं (Sanju Samson) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये आतापर्यंत 16 एकदिवसीय साामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 99.60च्या स्ट्राईक रेटनं 510 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 56.66 राहिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 108 आहे. त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 1 शतक देखील झळकावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाहा, अशी करतात फलंदाजी! गंभीरच्या भारताच्या स्टार फलंदाजाला टिप्स; सराव सत्राचा VIDEO व्हायरल
ICC T20 RANKING: भारतीय महिलांनी आयसीसी टी20 क्रमवारीत घेतली झेप
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी स्टार क्रिकेटपटू बाबा बागेश्वर धामच्या दर्शनाला, पाया पडून घेतला आशिर्वाद