भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज बुधवारपासून (१ ऑगस्ट) सुरवात होत आहे.
या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीची या इंग्लंड दौऱ्यात कामगिरी कशी होणार यावरुन सर्वत्र जोरदार चर्चा होत होती.
या चर्चेला पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने पूर्णविराम दिला आहे.
“मी अशा कोणत्याही मनस्थितीत नाही की मला इथे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. मी इथे फक्त संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे मला संघासाठी धावा करायच्या आहेत आणि भारतीय क्रिकेट संघाला पुढे न्यायचे आहे.” असे विराट पत्रकार परिषदेत म्हणाला.
तसेच कोहलीने तो एक व्यक्ती म्हणून खूप परीपक्व झाला आहे आणि टीकाकारांकडे तो दुर्लक्ष करायला शिकलाय असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले.
“मी जेव्हा नवखा होतो त्यावेळी वृत्तपत्रे वाचायचो त्यामुळे साहजिकच माझ्यावर दडपण यायचे. मात्र आता मी कोणतेही वृत्तपत्र वाचत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणीही काहीही टीका केली तर मला फरक पडत नाही. खेळावर लक्ष केंद्रीत करने हे माझे एकमेव ध्येय आहे.” असे कर्णधार कोहली म्हणाला.
२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीची कसोटी मालिकेत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती. त्याचा पाच कसोटी सामन्यात फक्त १३४ धावा करता आल्या होत्या.
ग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच
-टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम