भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला बुधवारपासून (१ ऑगस्ट) सुरवात होत आहे.
या कसोटी मालिकेत भारतीय संघ विजयी कामगिरी करेल असे मत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने व्यक्त केले आहे.
तसेच इंग्लंडला इंग्लंडच्या भूमिवर पराभूत करण्याची धमक फक्त भारतीय संघातच आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जडेजा म्हणाला.
“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात आमच्याकडे अनुभवी खेळाडू नव्हते. आता मात्र तसे नाही. आज आमच्याकडे अनुभवी खेळाडूंसह गोलंदाजांची भक्कम फळी आहे. तसेच गोलंदाजीत अनेक पर्याय आमच्याकडे आहेत.” असे जडेजा म्हणाला.
“आज जगात भारत हा एकमेव संघ आहे. जो इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करु शकतो. कारण भारतीय संघात जवळपास सगळ्याच खेळाडूंकडे २५-३० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना अनुभवाचा तुम्हाला कायमच लाभ होत असतो.” असे मत जडेजाने व्यक्त केले.
आज बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि नवखा कुलदीप यापैकी अंतिम ११ खेळाडूंच्या संघात कोणाला स्थान मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-विराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे
-‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही