भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी दक्षिण आफ्रिका महिला भारत दौरा भारताच्या सर्व स्वरुपाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. भारत दक्षिण आफ्रिकेचे तीन एकदिवसीय, एक कसोटी आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.
प्रथम 16 जून ते 23 जून दरम्यान तीन एकदीवसाय सामने बेंगलुरु येथे होणार आहेत त्यानंतर एक कसोटी सामना 28 जून ते 1 जुलै दरम्यान चेन्नई येथे खेळले जाणार आहे. तर तीन टी20 सामन्यांची मालिका 05 जुलै ते 9 जुलै दरम्यान चेन्नई येथेच खेळली जाणार आहे.
महिला निवड समितीने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी बहु-स्वरूपातील आयडीएफसी फर्स्ट बँक मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला.
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार ), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स , रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, राधा यादव, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्रकार, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया
कसोटीसाठी भारताचा कसोटी संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्ज , ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार ), स्मृती मानधना (उपकर्णधार ), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स , सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्रकार, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी
राखीव खेळाडू: सायका इशाक
आयसीसी महिला टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे. महिला टी20 विश्वचषक 2024 ऑक्टोबर मध्ये बांग्लादेश येथे खेळली जाणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
काय सांगता! टी20 विश्वचषक विजेत्याला मिळते एवढी रक्कम, उपविजेता संघही मालामाल
संदीप लामिछानेचा टी20 विश्वचषक स्वप्न भंगले! अमेरिकन दूतावासाने पून्हा नाकारले संदीपचा व्हिसा
यंदाच्या टी20 विश्वचषकात अनेक विक्रम मोडित निघणार, ‘या’ दिग्गज खेळाडूंवर राहणार नजर