आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत (commonwealth games) २४ वर्षानंतर क्रिकेट खेळाचे पुनरागमन होणार आहे. क्रिकेट खेळाचा विस्तार होण्यासाठी आणि आणखी लोकप्रिय होण्यासाठी ही सकारात्मक बाब आहे. आता राष्ट्रकुल स्पर्धेत देखील चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान रंगणार पहिली लढत
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आला असून, ही स्पर्धा २९ जुलै पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (Indian women’s team vs australia womens team) आमने-सामने येणार आहेत. हे सामने बर्मिंघममध्ये पार पडणार आहेत.
तब्बल २४ वर्षानंतर क्रिकेटचे पुनरागमन
बाद फेरीतील पहिला सामना २०२० महिला आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचे विजेता ऑस्ट्रेलिया संघ आणि भारत या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना २९ जुलै रोजी पार पडेल. तब्बल २४ वर्ष उलटल्यानंतर या स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. यापूर्वी १९९८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान आधीच पात्र ठरले आहेत. बार्बाडोस, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि भारत अ गटात आहेत तर ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ७ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
यापूर्वी १९९८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांची क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यावेळी शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ४ गडी राखून विजय मिळवला होता. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने आणि सनथ जयसुर्या सारख्या दिग्गजांनी सहभाग घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :
अर्रर्रर्र… अतिउत्साह नडला! हातातली मॅच एका चुकीने गमावली, पाहा शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलं
कॅप्टन जोमात! उपांत्य सामन्यापूर्वी यश धूलने दाबली ऑस्ट्रेलियाची दुखरी नस; म्हणाला…