---Advertisement---

विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म

On: सोमवार, ऑक्टोबर 12, 2020 6:24 PM
---Advertisement---

जेव्हा आयपीएलमध्ये एखादा खेळाडू खराब फॉर्ममध्ये असतो, तेव्हा संघ त्याच्याऐवजी अंतिम अकरामध्ये दुसर्‍या खेळाडूचा विचार करतो. परंतु जेव्हा तोच खेळाडू संघाचा विश्वासू खेळाडू असेल, तेव्हा त्याला खराब कामगिरी करूनही सतत संधी मिळते.

खरंतर या खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघाला काही फायदा होत नाही. परंतु विरोधी संघांसाठी ती खूप आनंदाची गोष्ट असते. कारण त्यांना माहित आहे की विरोधी संघाचा एक खेळाडू सध्या फॉर्ममध्ये नाही. मग त्या खेळाडूचा विचार न करता उर्वरित खेळाडूंविरूद्ध रणनीती आखली जाते.

या लेखात आम्ही आयपीएलच्या ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे सध्याच्या हंगामात नियमित खेळत आहेत पण ते सतत खराब कामगिरी करत आहेत आणि विरोधी संघ त्यांची कामगिरी पाहून आनंदात असतील.

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत ग्लेन मॅक्सवेलची अत्यंत खराब कामगिरी राहिली आहे. तरी किंग्ज इलेव्हन पंजाब संघ त्याला सातत्याने संधी देत ​​आहे. आयपीएलच्या सध्याच्या हंगामातील ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीवर नजर टाकल्यास किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्याने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने १४.५० च्या सरासरीने फक्त ५८ धावा केल्या आहेत.

आयपीएलच्या दृष्टीकोनातून आतापर्यंतची त्याची ही अतिशय खराब कामगिरी म्हणता येईल. आयपीएलपूर्वी ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून शानदार फलंदाजी केली होती. पण आयपीएलमध्ये तो चांगली फलंदाजी करताना दिसत नाही तसेच गोलंदाजीतही संघाला योगदान देत नाही.

किंग्ज इलेव्हन पंजाब कदाचित मॅक्सवेलच्या कामगिरीवर खुश नसेल. पण विरोधी संघ बहुधा खुश असतील. ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंतच्या ७ सामन्यांत फक्त एकच सामना जिंकला आहे.

केदार जाधव

चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील असलेला केदार जाधवही या हंगामात खराब फॉर्मशी झगडत आहे. जेव्हा केदार जाधव १२ चेंडूत ७ धावा करून कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द पॅव्हिलियनमध्ये परतला, तेव्हा क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला. कारण जेव्हा केदार जाधव मैदानावर फलंदाजीला आला, तेव्हा चेन्नई सुपर किंग्जला जिंकण्यासाठी २१ चेंडूत ३९ धावांची गरज होती.

संघाने आशा व्यक्त केली की ते सामना जिंकतील. परंतु जेव्हा केदार जाधव मैदानावर पोहोचला, तेव्हा कदाचित त्याला विसर पडला असेल की आपल्याला कसोटी क्रिकेट नाही, तर टी-२० क्रिकेट खेळायचे आहे. या हंगामातील केदार जाधवने केलेल्या कामगिरीकडे पाहता त्याने आतापर्यंत ६ सामने खेळले असनू ज्यामध्ये त्याने ९८.३५ च्या स्ट्राईक रेटने फक्त ५८ धावा केल्या आहेत.

केदार जाधव अशीच फलंदाजी करत राहिल्यास चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध खेळणाऱ्या विरोधी संघांला मोठा फायदा होईल. कारण जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज लक्ष्याचा पाठलाग करत असेल, तेव्हा विरोधी संघांचे गोलंदाज केदार जाधवसमोर चांगली गोलंदाजी करू शकतील.

दिनेश कार्तिक

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकची कामगिरी यावर्षी अपेक्षेपेक्षा वाईट होत आहे. दरवर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून मॅच विनर ठरणारा दिनेश कार्तिक यावर्षी विरोधी संघांविरुद्ध धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
या हंगामात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, तर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांत तो फक्त २ षटकार मारू शकला. त्याने १३८.९६ च्या स्ट्राईक रेटने यावर्षी ६ सामन्यांत १०७ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकच्या या कामगिरीमुळे विरोधी संघांना फायदा होतो.

ट्रेंडिंग लेख-

-सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास?

-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?

-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज

महत्त्वाच्या बातम्या-

-काय सांगता.! त्याने एक-दोन नाही तर तब्बल ७ चेंडू टाकले ‘यॉर्कर’

-चेन्नई सुपर किंग्ज संघातील दुसरा धोनी? जाणून घ्या कोण आहे ‘तो’ खेळाडू

-आयपीएलमध्येही बोलू मराठीतच; झहीर खान बीडच्या ‘या’ खेळाडूला देतोय मराठीत गोलंदाजीचे धडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---