दिल्ली कॅपिटल्सचा युवा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने या हंगामात खेळलेल्या 5 सामन्यात 179 धावा केल्या आहेत. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानी आहे. आमच्या संघाने या हंगामाची चांगली सुरुवात केली आणि अशीच कामगिरी आम्ही पुढेही सुरु ठेवू, असे मत त्याने व्यक्त केले आहे. बेंगलोरविरुद्ध त्याला अधिक वेळ खेळपट्टीवर टिकून खेळायचे होते असेही त्याने पुढे सांगितले.
पृथ्वीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध 23 चेंडूत 42 धावांची खेळी खेळून डावाची चांगली सुरुवात केली होती. दिल्लीने 59 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला होता.
अशीच कामगिरी पुढेही करणार..
त्याच्या तयारीबद्दल बोलताना पृथ्वी म्हणाला, “या स्पर्धेत आम्ही चांगली सुरुवात केली आणि आम्हाला अशीच कामगिरी पुढेही सुरु ठेवायची आहे. सराव सत्रात खेळलेले सर्व फटके सामन्यादरम्यान अचूक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. संघात सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत संघ चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत सर्वच खेळाडूंनी त्यांचे कौशल्य दाखवले आहे आणि पुढेही ते चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.”
पुढील सामन्यांवर आहे लक्ष
बेंगलोरविरुद्ध सोमवारी (5 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात शॉने अर्धशतक झळकावले. हे या हंगामातील त्याचे तिसरे अर्धशतक होते. दिल्लीकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कर्णधार श्रेयस अय्यरनंतर त्याचा क्रमांक येतो. बेंगलोर विरुद्ध खेळलेल्या खेळीबद्दल शॉ म्हणाला, “मला पावरप्लेनंतरही खेळायचे होते पण दुर्दैवाने मी बाद झालो. मी आता पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.”






