भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने मागच्या वर्षी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला. त्याने आयपीएल (IPL) २०२१ हंगामादरम्यान घोषित केले होते की, पुढच्या हंगामापासून तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व करणार नाही. आता पुढच्या हंगामात विराट नेतृत्व करणार नसल्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक शंका नक्कीच आहे की, विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण असेल? आपण या लेखात अशाच काही नावांचा विचार करणार आहोत, जे विराटनंतर आरसीबीचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी दावेदार आहेत.
विराटने मागच्या वर्षी आसरीबीचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद देखील सोडले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटकडून भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले. तसेच दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला पराभव मिळाल्यानंतर विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले. सध्या परिस्थिती अशी आहे की, विराटकडे कोणत्याही प्रकारातील कोणत्याच संघाचे कर्णधारपद राहिलेले नाहीय. आता आयपीएल २०२२ जवळ आल्यामुळे चाहत्यांना आरसीबीच्या कर्णधारपदाविषयी उत्सुकता वाढली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार –
ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) –
आरसीबीने पुढच्या हंगामासाठी रिटेन केलेलल्या तीन खेळाडूंमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांची नावे आहेत. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. आयपीएलच्या मागच्या काही हंगामांमध्ये त्याचे प्रदर्शन अपेक्षित राहिले नाहीये. पण कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्याच्या प्रदर्शनात बदल होऊ शकतो. आरसीबीचे माजी कर्णधार डेनियल विटोरीला देखील असेच वाटते की, एका हंगामासठी का असेना, पण मॅक्सवेलला आरसीबीचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) –
दिल्ली कॅपिटल्ससाठी श्रेयस अय्यरने एका चांगल्या कर्णधाराची भूमिका पाडली होती. मात्र, संघाने पुढच्या हंगामासाठी त्याला रिटेन केले नाही. अशात मेगा लिलावात अनेक फ्रेंचायझी श्रेयसवर बोली लावण्यासाठी इच्छुक असतील. जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला विकत घेतले, तर त्याला संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. श्रेयसकडे ८७ आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ अर्धशतके ठोकली आहेत.
डेविड वॉर्नर (Devid Warner) –
सनरायझर्स हैदराबादने ज्याच्या नेतृत्वात त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली, तो डेविड वॉर्नर देखील आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी होणार आहे. त्याने २०१६ मध्ये हैदराबाद संघाला जेतेपद मिळवून दिले होते. पण मागच्या हंगामात वॉर्नरसोबत फ्रेंचायझीकडून गैरवर्तन झाले होते. त्याच्याकडून सुरुवातील संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले आणि नंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही सामील केले गेले नाही. आरसीबी संघ जर वॉर्नरला विकत घेऊ शकला, तर त्याला नक्कीच संघाचे कर्णधारपद देखील दिले जाईल.
मनीष पांडे (Manish Pandey) –
मनीष पांडेविषयी काही वृत्तांमध्ये दावा केला गेला आहे की, आरसीबी मेगा लिलावात त्याला विकत घेऊन संघाचा कर्णधार बनवेल. कर्नाटकच्या या क्रिकेटपटूने यापूर्वी तीन हंगामांमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे. मनीष देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघासाठी रणजी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारखे सामने खेळतो. त्याने आतापर्यंत १५४ आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये ३०.६७ च्या सरासरीने ३५६० धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘सदर्न डर्बी’त तमिल थलाइवाजची बाजी! बेंगलोर बुल्स पुरती निष्प्रभ
विराटने पोस्ट केला नवा फोटो; कॅप्शनने वाढविले नेतृत्व वादाचे गूढ
शुबमन गिलला रिलीज केल्याचा केकेआरला होतोय पश्चाताप! कोच मॅक्युलम म्हणाला…
व्हिडिओ पाहा –