आयपीएलमध्ये खराब कामगिरीमुळे दिल्ली डेयरडेविल्सला संघर्ष करावा लागत आहे. त्यातच त्यांना दोन दिवसापूर्वी गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
गंभीरने याआधी कोलकता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना 2 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. यावर्षी तो दिल्ली डेयरडेविल्सची धूरा संभाळत होता.
पण दिल्लीचा सततच्या होणाऱ्या पराभवामुळे गंभीरने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
यानंतर आयपीएल २०१८च्या उरलेल्या सामन्यांसाठी श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
यासाठी गंभीरने कर्णधारपदाचा दबाव सहन होत नसल्याचे सांगितले होते. ज्या स्थितीत आपला संघ आहे त्यासाठी मी जबाबदार असून, कर्णधार म्हणून पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचेही गौतम म्हणाला.
त्यासोबतच तो म्हणाला की कोणताही खेळाडू संघापेक्षा मोठा नाही त्यामुळे मी जरी संघाचा कर्णधार नसलो तरी मी सतत संघासाठी उभा असेन.
आयपीएलमध्ये याआधीही अशा घटना घडल्या आहेत. अगदी दिल्लीचा सध्या प्रशिक्षक असणारा रिकी पाँटिंगनेही अशाच कारणामुळे एकदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडले होते.
त्याचबरोबर संघाच्या खराब कामगिरीमुळे कर्णधारपद सोडण्याच्या यादीत कुमार संगकारा, केवीन पीटरसन, व्हीव्हीएस लक्ष्मण अशा दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये या खेळाडूंनी संघाच्या खराब कामगिरीनंतर सोडले होते कर्णधारपद:
2008: व्हीव्हीएस लक्ष्मणने सोडले होते डेक्कन चार्जर्सचे कर्णधारपद; यानंतर अॅडम गिलख्रिस्ट नविन कर्णधार
संघाचा निकाल: गुणतालिकेत शेवटचे स्थान
2009:केविन पीटरसनने सोडले होते रॉयल चँलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद; या नंतर अनिल कुंबळे नवीन कर्णधार
संघाचा निकाल: उपविजेते
2012: डॅनिएल विट्टोरीने सोडले होते रॉयल चँलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद; यानंतर विराट कोहली नविन कर्णधार
संघाचा निकाल: गुणतालिकेत पाचवे स्थान
2012: कुमार संगकाराने सोडले होते डेक्कन चार्जर्सचे कर्णधारपद; यानंतर कॅमेरॉन व्हाईट नविन कर्णधार
संघाचा निकाल: गुणतालिकेत नववे स्थान
2013: रिकी पाँटिंगने सोडले होते मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद; यानंतर रोहित शर्मा नविन कर्णधार
संघाचा निकाल: विजेतेपद
2014: शिखर धवन सोडले होते सनरायजर्स हैद्राबादचे कर्णधारपद; यानंतर डॅरेन सॅमी नविन कर्णधार
संघाचा निकाल:गुणतालिकेत सहावे स्थान
2015: शेन वॉटसन सोडले होते राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद; यानंतर स्टीव्ह स्मिथ नविन कर्णधार
संघाचा निकाल: बादफेरीत पराभव
2016: डेविड मिलरने सोडले होते किंग्ज इलेव्हनचे कर्णधारपद; यानंतर मुरली विजय नविन कर्णधार
संघाचा निकाल: गुणतालिकेत शेवटचे स्थान
महत्त्वाच्या बातम्या –
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली