आयपीएल 2024 च्या 25व्या सामन्यात काल (11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होती. मुंबईच्या होमग्राउंडवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सनं 3 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं आणि सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.
सामन्यादरम्यान मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा त्याला चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आलं. यावेळी विराट कोहलीनं चाहत्यांना हातवारे करुन हार्दिकला सर्पोट करण्याची मागणी केली.
विराटनं चाहत्यांना केली मागणी
197 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईला ईशान किशन आणि रोहित शर्मा या दोघांनी चांगली सुरुवात मिळवून दिली. किशनच्या रुपात मुंबईला पहिला झटका बसला. तर 12व्या षटकात रोहित शर्माच्या रुपात दुसरा झटका बसला. त्यानंतर सूर्यकुमार यादवला साथ देण्यासाठी मैदानावर आलेल्या हार्दिकला वानखेडे स्टेडियममधील चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. चाहत्यांना असं करताना पाहून विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली. कोहलीनं चाहत्यांना, “हार्दिकला ट्रोल करु नका”, असं इशाऱ्याद्वारे सांगितलं. “हार्दिक आपल्याच देशाचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला ट्रोल करु नये”, असा इशारा कोहलीनं चाहत्यांना केला.
Virat Kohli – the diamond of this sport. ❤️
– He’ll always stand up for sportsmanship. 👏pic.twitter.com/WntYDxSJIc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2024
विराट कोहलीच्या विनंतीचा चाहत्यांवर लगेच प्रभाव पडला. यानंतर सामन्यात चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करणं थांबवलं. काही वेळानंतर चाहते स्टेडियममध्ये ‘हार्दिक-हार्दिक’ अशी घोषणाबाजी करताना दिसले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘Hardik, Hardik’ chants at the Wankhede stadium last night. pic.twitter.com/bRiCQpmTTb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 12, 2024
गोलंदाजी दरम्यानही केलं ट्रोल
हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून चाहते त्याच्यावर सातत्यानं टीका करत आहेत. मुंबईच्या काही चाहत्यांना हार्दिक पांड्या अजूनही कर्णधार म्हणून मान्य नाही. सामना चालू असताना रोहितच्या प्रत्येक शॉटवर चाहते त्याची प्रशंसा करत होते, तर दुसरीकडे हार्दिक चांगली फलंदाजी करत असतानाही त्याला ट्रोल केलं जात होतं. तो जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला प्रत्येक ओव्हरदरम्यान ट्रोल केलं जात होतं.
मुंबईचा सामन्यात एकतर्फी विजय
टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 8 विकेट गमावून 196 धावा काढल्या. कर्णधार फाफ डु प्लेसीसनं 61 धावांची चांगली खेळी केली. रजत पाटीदार (50 धावा) आणि दिनेश कार्तिक (53 धावा) यांनीही मोलाचं योगदान दिल. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सनं ईशान किशन (69 धावा), रोहित शर्मा (38 धावा), सुर्यकुमार यादव (52 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर 15.3 षटकांतच जबरदस्त विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या
“याला वर्ल्डकप खेळायचा आहे”, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकची रोहितनं मैदानावरच खेचली!