---Advertisement---

क्रिकेट संपलं! आता धोनीने सुरु केला दुसराच उद्योग

On: शनिवार, एप्रिल 11, 2020 12:25 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे भारत सरकारने २१ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. तसेच बीसीसीआयने आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे. त्यामुळे सध्यातरी आयपीएलचे आयोजन करणे कठीण दिसत आहे.

अशामध्ये क्रिकेटपटू सध्या नक्की करतात तरी काय? हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढलेली असतेच. परंतु सध्या चाहत्यांना कोणत्या खेळाडूबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल, तर ती म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल (MS Dhoni).

लॉकडाऊन दरम्यान आयपीएलची (IPL) फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये धोनी आपल्या घराभोवतालच्या लॉनमधील गवत कापत आहे. याव्यतिरिक्त तो सध्या घरातील साफ सफाईचे कामही करत आहे.

मागील महिन्याच्या सुरुवातीपासून चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) सराव सत्र (Training Camp) आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान चेन्नईचा कर्णधार धोनीबरोबरच अनेक दिग्गज खेळाडू या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने (Suresh Raina) धोनीचे चेन्नई संघात स्वागत केले होते. परंतु काही दिवसांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे सत्र स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

धोनीने भारतीय संघाकडून शेवटचा सामना मागील वर्षी विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यावेळी भारतीय संघ पराभूत झाला होता. या सामन्यात धोनीने ५० धावा केल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी-

-थेट झाडावर चढून आयसीसीचा मोठा पंच बोलतोय फोनवर

-क्रिकेट आणि आकड्यांवरील प्रेमाचा मिलाफ

-भारतात येऊन भारतालाच चारीमुंड्या चीत करायचं म्हणतोय हा खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---