येत्या १९ सप्टेंबरपासून युएईत इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे उर्वरित सामने रंगणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील क्रिकेटपटू चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर युएईमध्येच आणखी एक मोठी स्पर्धा पार पडणार आहे. ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात खेळताना पाहायची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत भारतासह आणखी काही देशातील दिग्गज खेळाडू मैदानात उतरतील.
युएईमध्ये मार्च २०२२ मध्ये ‘लिजेंड्स लीग क्रिकेट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा देखील टी-२० स्वरूपात असणार आहे. याची घोषणा स्पर्धेच्या आयोजकांनी शुक्रवारी (१७ सप्टेंबर) केली आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा मैदानावर पाहण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान या स्पर्धेत कुठले खेळाडू खेळणार आहेत, याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाहीये. परंतु असा दावा करण्यात आला आहे की, या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार आहे. यापूर्वी माजी क्रिकेटपटूंसाठी देखील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ६ देशांच्या संघांनी सहभाग घेतला होता. यंदा ही स्पर्धा ३ संघांमध्ये खेळवली जाईल.
एका वर्षात २ वेळेस पार पडणार लीग
लिजेंड्स क्रिकेट लीग, एका वर्षात २ वेळेस पार पडेल अशी शक्यता आहे. पहिल्या सत्रात हंगामाचे आयोजन त्रिकोणीय स्वरूपात असेल. ज्यामध्ये भारतीय संघ, आशिया संघ आणि उर्वरित खेळाडूंचा विश्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. अंतिम सामन्यापूर्वी या स्पर्धेत ६ लीग सामने पार पडतील.
दरम्यान या स्पर्धेचे सह-संस्थापक आणि प्रवर्तक विवेक खुशलानी म्हणाले की, “ही एक मोठी स्पर्धा असेल. जेव्हा आम्ही या स्पर्धेबाबत विचार करत होतो त्यावेळी आम्ही खूप उत्साहित झालो होतो. आम्हाला भरपूर आनंद होत होता की, आम्हाला दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा खेळताना पहायची संधी मिळणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल: २००८-२०२०, ‘या’ फलंदाजांनी जिंकलीय ऑरेंज कॅप, ‘हा’ धुरंधर विक्रमतोड ४ वेळा ठरलाय मानकरी
अगग! पाकिस्तानचे इंग्रजीचे वांदे, ‘आम्ही न्यूझीलंडसाठी Fool प्रुफ नियोजन केले’ म्हणत झाले ट्रोल