---Advertisement---

कोकणात साजरा केला सचिनने 50 वा वाढदिवस! स्थानिकांच्या आनंदाला उरला नाही पारावर, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, एप्रिल 24, 2023 7:31 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान क्रिकेटपटू तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर सोमवारी (24 एप्रिल) आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन आपल्या आयुष्याची पन्नाशी पूर्ण करत असताना जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिनचे चाहते, त्याचे सहकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर लोक त्याला शुभेच्छा देताना दिसले. मात्र, आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सिंधुदुर्ग येथे साजरा करताना दिसला. सोशल मीडियावर ही छायाचित्रे व्हायरल होत आहेत.

वाढदिवस साजरा करण्यासाठी सचिन रविवारी दुपारी आपल्या काही मित्रांसह सिंधुदुर्ग येथील भोगवे या गावी पोहोचला. येथील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये तो आपला वाढदिवस साजरा करेल. गोवा येथे विमानाने उतरल्यानंतर सचिनने रस्त्याने भोगवेपर्यंतचा प्रवास केला. यादरम्यान चाहत्यांनी त्याला गराडा घातलेला. भोगवे येथील समुद्रकिनारी पर्यटकांची कमी गर्दी असते. त्यामुळे त्याने या ठिकाणाची निवड केल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी या ठिकाणी अनेक माजी क्रिकेटपटू तसेच अभिनेते येऊन गेले आहेत.

सचिन रविवारी सायंकाळी या समुद्रकिनारी फिरताना दिसलेला. त्यावेळी त्याने काही चाहत्यांसह छायाचित्रे काढली. सचिन तेंडुलकर याचे प्रशिक्षक राहिलेले दिवंगत रमाकांत आचरेकर हे ‌सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीचे रहिवासी होते. सचिन लहान असताना या ठिकाणी अनेकदा खेळण्यासाठी येत, अशी आठवण लोक सांगतात.

जागतिक क्रिकेटमधील असंख्य विक्रम नावे असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन हा देखील नुकताच आयपीएल मध्ये पदार्पण करताना दिसला. पहिल्या दोन सामन्यात प्रभावी कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याचे प्रदर्शन खराब झाले. त्यामुळे सचिन मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत होता.

(Cricket Legend Sachin Tendulkar Celebrate His Birthday At Bhogve Beach In Kokan With Local)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी 
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---