---Advertisement---

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

On: गुरूवार, सप्टेंबर 17, 2020 8:04 PM
---Advertisement---

१. संयुक्त अरब अमिराती युएई आयपीएलचं आयोजन करण्यास सज्ज झाला आहे. मंगळवारी दुबई आणि अबूधाबी स्टेडियम विद्युत रोषणाईनं सजवलं होतं. मुंबई-चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान सलामीचा सामना अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. हे मैदान 2004 मध्ये 100 कोटी रुपये खर्चून बांधलं आहे. या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय सामना 2006 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला होता. आयपीएल मधील सामने दुबई, अबुधाबी, शारजा या तीन मैदानावर होणार आहेत.

२. ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅलेक्स कॅरीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं, इंग्लंडवर तिसर्‍या वनडे सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला त्याच्यातच भूमीवर पराभूत करत पाच वर्षांनंतर विजेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियानं ही मालिका  2-1अशा फरकानं जिंकली. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 7 विकेट गमावून 305 धावांचे आव्हान दिलं होतं, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं  सात गडी गमावून आणि दोन चेंडू शिल्लक राखून हे आव्हांन पार केलं. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलनं सर्वाधिक 108 तर अलेक्स कॅरीनं 106 धावा केल्या. यष्टिरक्षक कॅरीचं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील हे पहिले शतक आहे.

३. गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतूराज गायकवाडच्या दोन्ही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तो क्वारंटाइनमध्ये असल्याने 19 सप्टेंबर रोजी अबुधाबी इथं, मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार्‍या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. ऋतुराजची प्रकृती ठीक असून, त्याला संघाच्या जैविकदृष्टय़ा सुरक्षित वातावरणात परत येण्यासाठी बीसीसीआयच्या परवानगीची आवश्यकता आहे. यासोबतच त्याला फिटनेस टेस्ट द्यावा लागणार, असल्याची माहिती सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी सांगितलं आहे.

४. आंद्रे रसेलचे नाव येताच त्याचे मोठमोठे षटकार डोळ्यासमोर येतात. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रसेल करत असतो. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणार्‍या या फलंदाजाबाबत त्यांच्या संघातील युवा खेळाडू रिंकू सिंगनं महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आंद्रे रसेलच्या बरोबरीचे फटके कोणीच खेळू शकत नाही. ती त्याची ताकद अाहे. त्याच्यासारखा स्पर्धेत दुसरा कोणताही फलंदाज दिसत नाही. सध्या तो जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असल्याचे रिंकू सिंगनं म्हटलं आहे.

५. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी इंडियन प्रीमियर लीगदरम्यान, सट्टेबाजी आणि इतर भ्रष्ट कारवाया रोखण्यासाठी यूके स्थित स्पोर्टरडारशी करार केला आहे. हे त्याच्या फ्रॉड डिटेक्शन सिस्टम (एफडीएस) च्या माध्यमातून सेवा प्रदान करतील.  फिफा आणि यूएफासारख्या मोठ्या फुटबॉल संस्थांमध्ये स्पोर्ट रडार कार्य करते. अलीकडे याच कंपनीने गोवा फुटबॉल लीगच्या सुमारे 6 सामन्यांमध्ये फिक्सिंगबद्दल बोलले होते. एफडीएसच्या मदतीने ही कंपनी सामन्यातील फिक्सिंगचा पर्दाफाश करते.

६. बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज सैफ हसन पुन्हा कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे त्यामुळे बांगलादेश क्रिकेट संघासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. कोरोनाची लागणं झाल्यानं, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं श्रीलंकेच्या दौर्‍यासाठी निवडलेल्या 27 सदस्यांच्या प्राथमिक पथकात, सैफ हसनची निवड केलेली नाही. यावर्षी त्यानं बांगलादेशकडून दोन कसोटी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर, या युवा खेळाडूची निवड बीसीबीनं राष्ट्रीय संघात केली होती.

७. पंजाबच्या पठाणकोट येथील क्रिकेटर सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला करणार्‍या मारेकऱ्यांचा पंजाब पोलिसांना सुगावा लागला आहे. बुधवारी पंजाब पोलिसांनी याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, हे तिघे आंतरराज्य दरोडेखोर आणि गुन्हेगारांच्या टोळीचे सदस्य आहेत. मात्र, या प्रकरणात आणखी 11 आरोपीचा पोलीस शोध लागलेला नाही. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे.

८. 2007 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानच्या त्या पराभवाबद्दल इम्रान नजीर यानं आता विधान केलं आहे. तसेच नजीरने पाकिस्तानच्या पराभवाची कारण मिमांसा सांगितली आहे. भारताविरुद्धचा टी -२० फायनलमधील पराभवाबद्दल आजीवन पश्चाताप केला जाईल, असं इम्रान नजीरनं सांगितलं आहे.

९. इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं यंदा भारताऐवजी युएईमध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी जैविक वातावरण तयार करण्यात आला आहे. तसेच दुबईत पोहोचल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाइनमध्ये राहावं लागलं. हा कालावधी म्हणजे बिग बॉसच्या घरात राहिल्यासारखा असल्याच, वक्तव्य दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन यांन केलं आहे.

१०. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘बायो सेफ’ वातावरणात इंडियन प्रीमियर लीग 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे. जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून या स्पर्धेकडं लागून राहिल्या आहेत. प्रत्येकजण अायपीएलच्या13 व्या हंगामातील विजेत्याचा अंदाज वर्तवित आहे. न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस यांनंही अशीच भविष्यवाणी केली आहे. स्टायरिसनं दिल्ली कॅपिटल्स संघाला विजेतेपदाचा दावेदार असल्याचं सांगितलं, तर आयपीएल 2008 चा विजेता राजस्थान रॉयल्सचा आठव्या क्रमांकार राहिल असा अंदाज वर्तविला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---