---Advertisement---

“कर्णधारपद तर सोडा बाबर आझम एकदिवसीय आणि टी20 साठी योग्य नाही” माजी क्रिकेटरने लगावला टोला

On: शनिवार, जून 22, 2024 4:35 PM
Babar-Azam
---Advertisement---

पाकिस्तान संघाची 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर यंदाच्या टी20 विश्वचषकातही निराशाजनक कामगिरी कायम होती.  बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा सपाटून गेला. परिणामी संघाला पहिल्या फेरीतूनच बाहेर पडावे लागले. टी-20 विश्वचषकात बाबर अँड कंपनीच्या अपयशामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू संतापले आहेत. एवढेच नाही तर त्याच्या कर्णधारपदावर तसेच फलंदाजीच्या क्रमावरही ते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. या मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटर शोएब अख्तरनेही आपले मत मांडले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर, मार्टिन गुप्टिल, युनूस खान आणि मोहम्मद हाफीज एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. यादरम्यान 48 वर्षीय शोएब अख्तर म्हणाला, ‘बाबर आझम कर्णधारपदाच्या लायक नाही.’ एवढेच नाही तर तो पुढे म्हणाला, ‘जर बाबरने दबाव घेतला नाही आणि पाकिस्तानसाठी सामना संपवला नाही तर तो वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये आपले स्थान टिकवून ठेवू शकणार नाही.’

एवढेच नाही तर शोएब अख्तरने बाबर आझमला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करुन सामना संपवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या तो अनेकदा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना दिसतो. याशिवाय कसोटी फॉरमॅटमध्ये तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो.

बाबर आझमच्या संघाने यंदाच्या विश्वचषकातील साखळी सामन्यात एकूण चार सामने खेळली. ज्यामधील 2 सामने जिंकला तर 2 सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. संघाने अमेरिका विरुद्ध पहिल्या सामन्या सुपर-ओव्हर मध्ये सामना गमावला होता तर भारताविरुद्ध सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला.

महत्तवाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूचे बांग्लादेशविरुद्ध आकडे शानदार, रोहित शर्मा संघात संधी देणार का?
भारत-बांगलादेश सामन्यात हे 3 मोठे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात, अर्शदीप सिंगकडे इतिहास रचण्याची संधी
वर्ल्डकपच्या झगमगाटापासून दूर, माही मित्रांसोबत लुटतोय सुट्यांचा आनंद! पाहा व्हिडिओ

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---