यंदाच्या टी20 विश्वचषक मधील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर पुन्हा टी20 विश्वचषक जिंकली. चक्री वादळमाुळे टीम इंडिया विश्वचषक जिंकून 3 दिवसानंतर बार्बाडोसहून मायदेशी परतली. दिल्लीमध्ये पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही संपूर्ण टीमला पंतप्रधान निवासस्थानी बोलावून ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यादरम्यान त्याने अंतिम सामन्यातील शेवटच्या षटकाचा नायक हार्दिक पांड्यासह सर्व खेळाडूंशी चर्चा केली. पीएम मोदींसमोर हार्दिक भावूक दिसला.
आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. त्यानंतर 3-4 महिने हार्दिकला सतत ट्रोल करण्यात आले, मग तो मैदानात असो वा सोशल मीडियावर. अनेक दिग्गजांनी हार्दिकला पाठिंबा दिला असला तरी चाहते मात्र हार्दिकच्या खेळाची खिल्ली उडवताना दिसले. हार्दिकने पंतप्रधान मोदींसमोर या मुद्द्यावर मौन सोडले आहे.
#WATCH | During his interaction with PM Modi, Cricketer Hardik Pandya said, “…Last 6 months have been very entertaining for me, there have been a lot of ups and downs and the public booed me. A lot of things happened and I always felt that if I give any answer, it would be… pic.twitter.com/bzti1hNUKu
— ANI (@ANI) July 5, 2024
जेव्हा पीएम मोदी हार्दिककडे वळले तेव्हा स्टार ऑलराऊंडर म्हणाला, ‘गेले 6 महिने माझ्यासाठी खूप मनोरंजक होते. खूप चढ-उतार आले आणि लोक मला वाईट बोलले. बऱ्याच गोष्टी घडल्या आणि मला नेहमी वाटायचं की मला उत्तर द्यायचं असेल तर ते खेळातूनच द्यायला हवं. त्यामुळे मी खंबीर राहीन आणि कठोर परिश्रम करेन असा विश्वास होता. मी खूप मेहनत केली आणि शेवटचे षटक टाकण्याची संधी मिळाली.
टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने 16 धावांचे बचाव करताना शानदार गोलंदाजी केले. पांड्याने विस्फोटक वाटणाऱ्या डेव्हिड मिलरला पहिल्या सूर्यकुमार यादवच्या हाती बाद केले. सूर्याने अप्रतिम झेल झेलत सामना भारताच्या बाजूने खेचला.
महत्तवाच्या बातम्या-
नाद-बाद कॅच घेणाऱ्या सुर्याचे घरी झाले असे हटके ‘स्वागत’, पहा व्हिडीओ…
टीम इंडियाचे नवे पर्व सुरु, भारतविरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिकेला आजपासून सुरुवात
दक्षिण आफ्रिकेचा पलटवार, 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी