भारतीय संघाने बांग्लादेशविरुद्धचा पहिला टी20 सामना शानदार पद्धतीने सहज जिंकला. आता दोन्ही संघांमधील दुसरा सामना उद्या (09 ऑक्टोबर) बुधवारी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो. या बातमीद्वारे जाणून घेऊयात दुसऱ्या सामन्यात कोणते खेळाडू खेळण्याची शक्यता आहे.
सलामीवीर म्हणून फक्त संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माला संधी मिळू शकते. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सामन्यात सलामी दिली होती. आता पुन्हा एकदा तेच सलामी देऊ शकतात. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. मात्र चौथ्या क्रमांकासाठी संघात मोठा बदल होऊ शकतो. गेल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डीला वगळले जाऊ शकते. नितीश रेड्डीने गोलंदाजी करताना 2 षटकात 17 धावा दिल्या आणि फलंदाजी करताना 16 धावा केल्या. त्यांच्या जागी टिळक वर्माला खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
यानंतर हार्दिक पांड्या, रियान पराग आणि रिंकू सिंग हे खालच्या फळीत संघात असतील. वरुण चक्रवर्तीने गेल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. या कारणामुळे तो खेळणार हे निश्चित आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरलाही या सामन्यात खेळवता येईल. मयंक यादव आणि अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजांमध्ये खेळू शकतात. या दोन्ही गोलंदाजांनी गेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रियान पराग रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
टीम इंडियाने पहिल्या टी20 सामन्यात बांग्लादेशचा 7 विकेटने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा संघ केवळ 127 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य 11.5 षटकांत केवळ 3 गडी गमावून सहज गाठले. अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून गाैरवण्यात आले.
हेही वाचा-
Vinesh Phogat; पहिल्याच निवडणुकीत विनेश फोगट यशस्वी, भाजपाच्या उमेदावाराचा पराभव
IND vs BAN: दुसऱ्या टी20 साठी टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल; अश्या पद्धतीने झाले स्वागत
रणजी ट्राॅफी; मुंबईला धक्का; पहिल्या सामन्यापूर्वी स्टार फलंदाज संघाबाहेर