आयपीएल 2024 काल (9 एप्रिल) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्जवर अवघ्या 2 धावांनी मात केली. पंजाबने नाणेफेक जिंकल्यावर पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रम दिले. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबाद टीमनं 183 धावांचं लक्ष्य पंजाबसमोर ठेवले. हैदाबादकडून खेळताना सर्वाधिक धावा(64) नितीश कुमार रेड्डीनं केल्या. प्रत्युत्तरात पंजाब संघाचा टॉप ऑर्डरला चांगले प्रदर्शन करता आले नाही. परंतु खालच्या फळीतील दोन फलंदाजांनी चाहत्यांची मनं जिंकली. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या दोघांनी चांगली फलंदाजी केली पण ते सामना जिंकवून देण्यास असमर्थ राहिले. सामना संपल्यावर कर्णधार शिखर धवनने या दोन युवा खेळाडूंचं भरभरून कौतुक केलं आहे.
सामना संपल्यावर कर्णधार शिखर धवनने सांगितले की, “शशांक आणि आशुतोष या दोघांनी चांगली खेळी केली. मला असं वाटतयं की आम्ही हैदराबाद संघाला एक चांगल्या धावसंख्येवर थांबवलं होतं. दुर्दैवाने आम्ही प्रथम 6 षटकांचा फायदा घेऊ शकलो नाही आणि आम्ही तिथेचं सामन्यात पराभूत झालो. खेळपट्टी खेळण्यासाठी म्हणावी तशी चांगली नव्हती. त्यामुळे विचार करुन फलंदाजी करावी लागतं होती. आम्ही शेवटच्या षटकात झेल सोडला. जर तो झेल सोडला नसता तर हैदराबादच्या 10-15 धावा कमी झाल्या असत्या. या सामन्यात आम्ही सगळे एकत्रित खेळू शकलो नाही.”
शिखर धवननं दोन युवा खेळाडूंचं कौतुक करत पुढे सांगितले की, “शशांक आणि आशुतोष या युवा खेळाडूंना चांगले प्रदर्शन करताना पाहून आनंद होत आहे. आम्हाला आशा होती की ते सामना समाप्त करतील, पण त्यांचे कौतुक करतो की त्यांनी सामना अटीतटीचा केला. या दोघांचे प्रदर्शन आम्हाला पुढील सामन्यात आत्मविश्वास देईल. जर पुढील सामने जिंकायचे असतील तर आम्हाला संघात काही सुधार करायला हवे आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पंजाबवर 2 धावांनी विजय
हैदराबाद विरुद्ध शिखर धवननं पहिल्याचं चेंडूवर केली मोठी चूक, अर्शदीप सिंगनं वाचवली पंजाबची इज्जत