भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका कोणाच्या बाजूने झुकणार हे पहिल्या सामन्यानंतर लक्षात येणार आहे.
असे मत भारताचे माजी फिरकीपटू मनिंदर सिंग यांनी आपल्या इंग्लंड मधील अनुभवाच्या जोरावर व्यक्त केले आहे.
“मला खात्री आहे की भारत-इंग्लंड कसोटी मालिका चुरशीची होणार आहे. भारताने ही कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरायला हवे. तरच भारतीय संघ इंग्लंड विरुद्द इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो.” असे मनिंदर सिंग म्हणाले.
“भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा निर्णय पहिल्या सामन्यातच होणार आहे. जो संघ पहिला सामना जिंकेल तो संघ या मालिकेत नक्की वर्चस्व गाजवेल.” असे मत मनिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत.
आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा भारतीय फलंदाज मैदानात उतरतील तेव्हा ते इंग्लिश गोलंदाजांचा कसा सामना करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम
–भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक?