यंदाच्या टी20 विश्वचषक 2024 सुपर-8 मधील सामन्यांना आजपासून (19 जून) सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा सुपर-8 मधील पहिला सामना उद्या 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या दरम्यान आयसीसीकडून मोठे अपडेट समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस टी20 आयसीसीच्या ऑल-राउंडर रँकींगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
ताज्या आकडेवारीनूसार मार्कस स्टॉइनिसने आयसीसीच्या अष्टपैलू रँकींगमध्ये नबीला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. स्टॉइनिस 231 रेटिंग सह टाॅपवर पोहचला आहे. तर 222 रेटिंग सह श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या स्थानी शाकीब अल हसन आहे. तर मोहम्मद नबी आणि सिंकदर रझा अनुक्रमे चाैथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत. तर या यादीत सातव्या स्थानी भारतीय खेळाडू हार्दिक पांड्याचा समावेश आहे.
MARCUS STOINIS – Number 1 ranked all-rounder in T20I. ????
– The Hulk of Australian cricket. pic.twitter.com/PinpyOue1k
— Johns. (@CricCrazyJohns) June 19, 2024
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने यंदाच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील 4 सामन्यांत त्याने 156 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक स्ट्राइक रेटने फलंदाजी करणाऱ्या खेळाडू मध्ये तो अव्वल स्थानी आहे. या आवृत्तीत त्याने 190.24 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. यादरम्यान 4 सामन्यापैकी 2 सामन्यात सामनावीरचा मानकरी ठरला आहे. तर गोलंदाजीत देखील त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघाचा सुपर-8 मधील शेवटचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. तर अश्या परिस्थितीत टीम इंडियासाठी मार्कस स्टॉइनिस घातक ठरु शकतो. मार्कस स्टॉइनिसने आतापर्यंत 63 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 1096 धावा केल्या आहेत. तर यादरम्यान त्याने गोलंदाजीत 35 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर गौतम गंभीरपुढे कोणती आव्हानं असतील?
नव्याने तयार होत असलेल्या या स्टेडियमकडे मोदींचे जातीने लक्ष; का आहे खास?
टीम इंडियात होणार नव्या विकेटकीपरची एंट्री! मयंक यादवला संधी मिळणार का?






