भारतीय संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यापासून २९० क्रिकेटपटूंनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
या २९० क्रिकेटपटूपैकी अनुसुचित जाती आणि जमातीमधील फक्त ४ क्रिकेटपटूंनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. अशा अाशयाचे वृत्त एका इंग्रजी संकेस्थळावर प्रसिद्ध झाले होते.
यावर खेळामध्ये जात धर्म आणल्याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने या संकेत स्थळावर जोरदार टिका केली आहे.
How many prime time journalists are SC or ST or for that matter how many senior editors in your organisation are SC or ST. Sports is perhaps one field which has successfully broken barriers of caste,players play with inclusiveness but then we have such journalism to spread hatred https://t.co/ludDNpPi3x
— Mohammad Kaif (@MohammadKaif) July 29, 2018
मोहम्मद कैफने ट्विट करत या वृत्त संकेतस्थळात अनुसुचीत जाती आणि जमातीचे किती प्राइम टाईम पत्रकार आणि किती वरीष्ठ पत्रकार आहेत असा जाब विचारला.
तसेच खेळ हे असे एकच माध्यम आहे ज्यामुळे भारतातील जाती-धर्माच्या भिंती तोडून लोक एकत्र येतात, असे कैफ त्याच्या ट्विटमध्ये पुढे म्हणाला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र
-षटकार आणि गेल! पुन्हा एकदा ख्रिस गेलचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ