आयसीसी टी20 विश्वचषकास येत्या 2 जून पासून सुरुवात होणार आहे. यंदाचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडीजच्या धर्तीवर खेळला जाणार आहे. टीम इंडीया विश्वचषकासाठी अमेरिकेत दाखल झाली आहे. भारतीय खेळाडू विश्वचषकापूर्वी कसून सराव करताना दिसत आहेत. टीम इंडीया यंदाच्या विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार संघ मानली जात आहे. भारतीय संघ 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकाच्या आवृत्तीमध्येच विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर संघास खिताब जिंकण्यात यश मिळालेला नाही.
तत्पूर्वी टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा आणि सर्वोत्तम स्ट्राईक रेटने फलंदाजी केलेल्या खेळाडू पाहणार आहोत.
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा टीम इंडीयाचा स्टार फलंदाज विराट कोहली आहे. आतापर्यंत विराट कोहली ने 1141 धावा केल्या आहेत. किंग कोहलीने 2016 सालच्या विश्वचषकात 296 तर 2014 च्या स्पर्धेत 319 धावा कुटल्या होत्या. श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्दने दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने टी20 विश्वचषकात 1016 धावा केल्या आहेत. जयवर्दने श्रीलंकेच्या यशाचा रहस्य होता.
वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या माजी खेळाडूने टी20 विश्वचषकात 995 धावा केल्या आहेत. 2012 साली वेस्ट इंडीजला विश्वविजेता बनवण्यात ख्रिस गेलचा खूप मोठा योगदान होता. तर चाैथ्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत टी20 विश्वचषकात 963 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा सालामीवीर म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे. तर पाचव्या क्रमाकांवर तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने टी20 विश्वचषकात 897 धावा केल्या आहेत. या श्रीलंकेचा माजी खेळाडूने 2009 सालीच्या विश्वचषकात सर्वाधिक 314 धावा ठोकल्या होत्या.
सर्वोत्तम स्ट्राईक रेटच्या बाबतीत इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 144.48 च्या स्ट्राईक रेटने टी20 विश्वचषकात आतापर्यंत 27 सामन्यात 799 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी साउथ आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आहे. त्याने विश्वचषकात 29 सामन्यात 142.75 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. ज्यामध्ये 51 चाैकार तर 30 षटकरांचा समावेशआहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल येतो त्याने देखील 142.75 च्या स्ट्राईक रेटने विश्वचषकात 995 धावा केल्या आहेत.
तर स्ट्राईक रेटच्या बाबतीत चाैथ्या क्रमांकावर माहेला जयवर्धने आहे.त्याने विश्वचषकात 134.74 ने फलंदाजी केली आहे. तर पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वाॅर्नरने 133.2 च्या स्ट्राईक रेटने विश्वचषकात 806 धावा केल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी सौरव गांगुलीनं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “एखाद्याच्या आयुष्यात प्रशिक्षकाचे…”
“कंपालाच्या झोपडपट्टी पासून ते टी 20 विश्वचषक” युगांडा खेळाडूंनी घेतली गगन भरारी
पाकिस्तानचा 7 विकेट्सनं दारुण पराभव, इंग्लंडनं टी20 मालिकेवर गाजवले वर्चस्व