---Advertisement---

महागडी ऑडी कार आली कुठून? पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप!

---Advertisement---

टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ वादात सापडला आहे. आता या संघावर आणि कर्णधार बाबर आझमवरही मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. हा आरोप कोणा परदेशी व्यक्तीने नाही तर एका पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी संघ अमेरिका आणि भारताकडून पराभूत झाला होता. त्यामुळे पाकिस्तान सुपर-8 साठी पात्र ठरु शकला नाही.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचा आरोप होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार मुबशीर लुकमानचा आहे. मुबशीरने पाकिस्तानच्या पराभवाचा संबंध बाबर आझमला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंशी जोडला आहे.

व्हिडिओमध्ये मुबशीर लुकमान म्हणतात, ‘काही दिवसांपूर्वी मी पाहिले की बाबरकडे ऑडी ई-ट्रॉन आहे. खूप छान गाडी आहे. बाबर आझम म्हणाले की, माझ्या भावाने कार दिली आहे. तेव्हा मला वाटले की बाबरचा भाऊ काही मोठे काम करत असेल ज्यासाठी तो 7-8 कोटी रुपयांची कार गिफ्ट करत आहे. पण मी चौकशी केली असता बाबरचा भाऊ असे कोणतेही काम करत नसल्याचे कळले. मग मला प्रश्न पडला की ही कार (ऑडी) कुठून आली? येत्या काही दिवसात पीसीबीने आणखी तपास करावा.

पाकिस्तान संघ 2024 च्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडला असून पाकिस्तान संघ पुढील दोन महिने कोणतेही क्रिकेट खेळणार नाही. त्यांची पुढची मालिका ऑगस्टमध्ये बांग्लादेशविरुद्ध होणार आहे, त्यासंदर्भात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांना विश्रांती देण्यात येणार असल्याची बातमी आहे.

महत्तवाच्या बातम्या-

मोठी बातमी: बीसीसीआयनं जाहीर केलं टी20 विश्वचषकानंतरचं भारतीय संघाचं वेळापत्रक
टीम इंडियासाठी ‘हा’ खेळाडू एक्स फॅक्टर! टी20 विश्वचषकादरम्यान फलंदाजी पाहून रवी शास्त्रीं प्रभावित
IND vs AFG; सुपर 8 सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूचा रोहित-विराटला इशारा

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---