---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये राहुल द्रविडची दमदार एन्ट्री, या संघाची जबाबदारी सांभाळणार

On: बुधवार, सप्टेंबर 4, 2024 3:22 PM
Rahul Dravid Ipl Coach
---Advertisement---

भारतीय क्रिकेट क्षेत्रातून अत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारे माजी हेड कोच राहुल द्रविड यांच्या बाबतीत ही बातमी आहे. राहुल द्रविडने (भारतीय संघाचा वाॅल) आयपीएलमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. वास्तविक ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या रिपोर्टनुसार, आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान रॉयल्सने द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाने जूनमध्ये टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले होते. मात्र त्या स्पर्धेच्या समारोपाने त्याचा कार्यकाळही संपुष्टात आला. त्याला त्याचा कार्यकाळ वाढवण्याची संधी होती, परंतु त्याने पद सोडणे योग्य मानले. तेव्हापासून आयपीएलच्या आगामी हंगामात द्रविड कोणत्या तरी संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता ‘ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार राजस्थान राॅयल्सने राहुल द्रविडची संघाच्या हेड कोच पदी नियुक्ती केली आहे. परंतु अधिकृतपणे राजस्थान राॅयल्स संघाकडून अद्याप या बाबतीत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

टीममध्ये कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक आहे. आता द्रविडही संघाचा भाग बनला आहे. त्याच्यासोबत विक्रम राठाैर यांनाही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. राठाैर यांना सहाय्यक प्रशिक्षक करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार त्यांनीही करारावर स्वाक्षरीही केली आहे.

तसं पाहायला गेले तर, आगोदर पासूनच द्रविडचे आणि राजस्थान रॉयल्सशी जुने नाते आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग टी20 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. याशिवाय त्याने संघाला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये नेले. यानंतर 2014 आणि 2015 मध्ये मेंटॉरची भूमिका बजावली. त्यानंतर गुणतालिकेत संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

राहुल द्रविड 2015 पासून बीसीसीआयशी संबंधित आहे. प्रथम तो भारताच्या अंडर-19 आणि भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, नंतर एनसीएचे अध्यक्ष आणि शेवटी ऑक्टोबर 2021 पासून 2024 पर्यंत भारतीय वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सोबत होता.

हेही वाचा-

आयपीएल 2025 मध्ये राहुल द्रविडची दमदार एन्ट्री, या संघाची जबाबदारी सांभाळणार
महाराष्ट्राच्या पठ्ठ्याचा पॅरिसमध्ये डंका! सांगली जिल्ह्यातील सचिन खिलारीनं पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं रौप्य पदक
‘प्रो कबड्डी लीग’च्या नव्या हंगामाची घोषणा, या तारखेपासून अनुभवता येणार थरार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---