पाकिस्तान क्रिकेट संघ एका वर्षाहून अधिक काळ संघर्ष करत होता. आशिया कप 2023 पासून सुरू झालेला खराब कामगिरीचा प्रवास सुरूच होता. विश्वचषक 2023 आणि टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान संघ पूर्णपणे अपयशी ठरला. पण आता त्यानंतर मोहम्मद रिझवानकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात जाऊन एकदिवसीय मालिका जिंकली. आता दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर क्लीन स्वीप देण्यात आला आहे. बोर्डाने बाबर आझमच्या जागी रिझवानला एकदिवसीय आणि टी20 मध्ये पाकिस्तानचा कर्णधार बनवल्यानंतर संघाच्या कामगिरीत मोलाचे बदल झाले आहे. अश्या स्थितीत रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाला यश का मिळत आहे ते या बातमीद्वारे जाणून घेऊयात.
बाबर आझमवर नेहमीच मित्रांचा संघात समावेश केल्याचा आरोप होत होता. सतत खराब कामगिरी करूनही इमाम उल हक, हसन अली, इफ्तिखार अहमद आणि शादाब खान हे खेळाडू संघाचा भाग होते. पण रिझवानच्या कर्णधारपदाखाली असे झाले नाही. युवा सैम अयुबला सलामीची संधी मिळाली. ज्यात त्याची कामगिरी अप्रतिम राहिली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात चायनामन सुफियान मुकीमला संधी मिळाली. त्याने 4 फलंदाजांना बाद केले. सैम अयुबने शानदार कामगिरी करत आहे. रिजवानला कर्णधारपद मिळाल्यानंतर अबरार अहमदनेही पदार्पण केले असून त्याने 4 सामन्यात 10 बळी घेतले आहेत. मोहम्मद रिझवानकडे कर्णधारपद मिळाल्यानंतर पाकिस्तानकडून आठ खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली तो नैसर्गिक लीडर असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. बाबर आझमच्या बाबतीत असे नाही. रिझवानच्या नेतृत्वाखाली मुलतान सुल्तान्स संघ सलग चार हंगामात पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यामध्ये संघाने एकदा विजेतेपदही पटकावले. बाबरच्या बाबतीत असे नाही. त्याच्या चांगल्या फलंदाजीमुळे त्याला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आणि तो पूर्णपणे अपयशी ठरला.
हेही वाचा-
वनडे आणि टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूकडे नेतृत्व
SA vs PAK; स्टेडियममध्ये मुलाचा जन्म झाला, प्रेम ही व्यक्त झाले, क्रिकेट फॅन्ससाठी सामना संस्मरणीय ठरला
INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने एका हाताने घेतला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO