डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आसाम संघामध्ये चांगली कामगीरी करत पुन्हा तिच लय आयपीएल 2024 मध्ये दाखवून रियान पराग अलिकडच्या काळात चांगलाच चर्चत आला आहे. आता पून्हा एकदा रियानने टी20 विश्वचषकाबाबत वादग्रस्त विधान केला आहे.
कोणत्याही परिणामांची चिंता न करता बेधडकपणे आपले विधान मांडणारा युवा खेळाडू रियान परागने टी-20 विश्वचषकावर मोठे वक्तव्य केले आहे. एका संभाषणात रियान परागला जेव्हा आगामी टी20 विश्वचषकासाठी टाॅप-4 संघ काय असतील याबद्दल विचारले असता साहसी प्रतिक्रिया देत रियान म्हणाला, “मला टी20 विश्वचषक पाहण्यात कोमताही रस नाही. जेव्हा टी20 विशिवचषकासाठी माझी निवड होईल तेव्हा मी पाहीन आणि त्यावेळी टाॅप-4 संघाबद्दल विचार करेन.” असं वक्तव्य परागने केले आहे.
🗣️”Nobody matches Virat’s onfield aura”. #RiyanParag #T20WorldCup #TeamIndia #BharatArmy pic.twitter.com/xETkhN1Gok
— The Bharat Army (@thebharatarmy) June 1, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये ‘द भारत आर्मीशी’ बोलताना रियान म्हणाला, “भारतीय संघ नक्कीच टाॅप-4 मध्ये असणार आहे. पण संपूर्ण 4 संघाबद्दल विचारले असता रियान म्हणाला ‘हे एक पक्षपाती उत्तर असू शकते, पण अगदी प्रामाणिकपणे खरे सांगायचे झाले तर, मला संपूर्ण विश्वचषक बघायचा नाही. मी फक्त शेवटी कोण जिंकणार आहे एवढेच मी पाहणार आहे. ज्यात मी आनंदी आहे.”
जेव्हा मी विश्वचषक खेळेन तेव्हा टाॅप-4 संघाबद्दल विचार करेन. अलिकडेच रियान परागने दावा केला होता काहीही झाले तरी. तो एक दिवस नक्की भारतासाठी खेळणार. पराग पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता, ‘एखाद्या वेळी कदीतरी तुम्हाला मला घेऊन जावे लागेल, बरोबर? तेव्हां त्यामुळे मी भारताकडून खेळणार आहे, हा माझा विश्वास आहे.’ असे तो म्हणाला होता.
आसामच्या 22 वर्षीय रियानने यंदाच्या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याने जवळपास 150 च्या स्ट्राइक रेटने 573 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्ससाठी त्याने चाैथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांच्यासोबत टी20 विश्वचषकानंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे.
महत्तवाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना, चर्चा मात्र हार्दिक पांड्याची! नेमकं काय घडलं जाणून घ्या
झोपडपट्टीत दिवस काढले, प्यायला शुद्ध पाणी नव्हतं; युगांडाचा हा क्रिकेटपटू आता विश्वचषकात आपला जलवा दाखवणार!
इंग्लंड क्रिकेट संघात कायरन पोलार्ड शामिल! कॅरेबियन पॉवर हिटर दिसणार नव्या भूमिकेत