टी20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केला होता. त्यानंतर बीसीसीआय त्याच्या जागी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. वास्तविक, भारतीय संघाच्या टी20 मधील कर्णधाराबाबत क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. या पदासाठी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांची नावे आघाडीवर आहेत. कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादवला अधिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता अश्या परिस्थितीत रोहित शर्माने कर्णधारबाबत भूमिका मांडली आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हार्दिक पांड्या नव्हे तर सूर्यकुमार यादवला टी20 टीमचा पुढचा कर्णधार बनवण्यात येईल. हार्दिक पांड्याचा फिटनेस आणि उपलब्धता हे त्याला कर्णधार न बनवण्यामागे सर्वात मोठे कारण असल्याचे दिसते. हार्दिकच्या खराब फिटनेस रेकॉर्डमुळे त्याच्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं.
आता ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्याशिवाय रोहित शर्मा देखील सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याच्या बाजूने आहे. या वृत्तात पुढे सांगण्यात आले आहे की, गंभीर आणि अजित आगरकर यांनी हार्दिक पांड्याशी याविषयी आधीच चर्चा केली आहे. तर सूर्यकुमार यादव केवळ श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार नसून 2026 च्या टी20 विश्वचषकापर्यंत त्याला भारतीय टी20 संघाचा नियमित कर्णधार बनवले जाईल, असेही अनेक अहवालांद्वारे दावा केले जात आहे.
सूर्यकुमार यादव हा टी20 आंतरराष्ट्रीय मधील भारताचा आघाडीचा फलंदाज आहे. सूर्याला टी20 च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खूप वर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे त्याला कर्णधार बनवण्यासाठी अधिक पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याचा खराब फिटनेस त्याच्याकडून ही संधी हिरावून घेत आहे. मात्र, कर्णधारपदाबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशा स्थितीत कर्णधारपद कोणाला दिले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
एका फलंदाजामुळे दुसरा फलंदाज झेलबाद…! मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच
“मी इथे हरवलो आहे” शिखर धवनची इंस्टाग्राम पोस्ट जोरदार व्हायरल
“टी20 संघात विराट-रोहितची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, कपिल देव असं का म्हणाले?