---Advertisement---

हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजची ‘विक्ट्री परेड’, या पध्दतीने झाले जंगी स्वागत

On: शनिवार, जुलै 6, 2024 12:19 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर मुंबईत चॅम्पियन टीम इंडियाची विजय परेड काढण्यात आली. ज्यात लाखो चाहते पोहोचले होते. यानंतर सर्व खेळाडू आपापल्या शहर आणि घराकडे रवाना झाले. खेळाडू घरी पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजसोबत पण असेच दृश्य पाहायला मिळाले. जिथे संपूर्ण हैदराबादने मोहम्मद सिराजचे जंगी स्वागत केले आणि सिराजची विजयी परेड काढली. आता या विजय परेडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहम्मद सिराजच्या विजय परेडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोहम्मद सिराज रस्त्यावर चाहत्यांसोबत ‘लेहरा दो…’ हे गाणं गाताना दिसत आहे. आकाशात तिरंगा फडकवत मोहम्मद सिराजसोबत हे गाणेही चाहते रिपीट करत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी फटाके फोडले जात होते.

तत्तपूर्वी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिराज म्हणाला की विश्वचषक जिंकणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तो पुढे म्हणाला भारत खूप दिवसांपासून विश्वचषक जिंकण्याची वाट पाहत होता. आम्ही जिंकलो याचा मला खूप आनंद आहे.”

मोहम्मद सिराजच्या यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या कमगिरीबद्दल बोलायचे झाले. तर, न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप स्टेजच्या सर्व सामन्यांमध्ये सिराज खेळला. तिथली खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी योग्य होती. फ्लोरिडा येथे होणारा साखळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सिराजला तीन सामन्यांत एकच विकेट घेता आली असली, तरी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत त्याने विरोधी संघावर दबाव निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या 6 धावांच्या रोमहर्षक विजयात सिराजने 4 षटकात केवळ 19 धावा दिल्या. पण, वेस्टइंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या सुपर 8 स्टेज, सेमीफायनल आणि फायनलसाठी सिराजला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.

महत्तवाच्या बातम्या-

कचऱ्याची गाडी पाहून लगावले पाकिस्तान पाकिस्तानचे नारे! भारताच्या विजयी रॅलीतला हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्यानं असं काही सांगितलं, जाणून तुम्ही पण व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ
नाद-बाद कॅच घेणाऱ्या सुर्याचे घरी झाले असे हटके ‘स्वागत’, पहा व्हिडीओ…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---