तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा डावखुरा फिरकी गोलंदाज आर साई किशोरने नुकताच मोठा दावा केला आहे. सध्या तो या देशातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असल्याचे तो म्हणतो. रणजी ट्रॉफी फायनलमध्ये संघाचे नेतृत्व केल्यानंतर साई किशोर आयपीएल 2024 मध्ये खेळला, परंतु स्पर्धेच्या मधल्या टप्यात त्याच्या मानेला दुखापत झाली आणि तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र, दुखापतीमुळे त्याचा विश्वास कमी झाला नाही. तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला.ज्यामध्ये त्याने दमदार कामगिरी केली. यानंतर त्याला थोडा ब्रेक मिळाला आणि त्याने त्यात प्रशिक्षण घेतले.
‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना साई किशोरने दावा केला की तो देशातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. तामिळनाडूचा फिरकीपटू म्हणाला, “मला वाटते की मी देशातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. मला कसोटी सामन्यात उतरवा, मी तयार आहे. मला फारशी चिंता नाही.”
तो पुढे म्हणाला, “मी जडेजासोबत रेड बॉलच्या फॉरमॅटमध्ये कधीही खेळलो नाही. त्यामुळे तो काय करतो, त्याच्याकडून मला शिकायचे आहे. जो की माझ्यासाठी चांगला अनुभव असेल.” साई किशोर 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. तो दुलीप ट्रॉफीच्या टीम-‘बी’ चा भाग आहे, ज्याचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन करणार आहे.
गुजरात टायटन्सने 2022 च्या मेगा लिलावात साई किशोरला 3 कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. सईने आतापर्यंत 10 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना 13 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 8.32 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या.
खरं तर, साई किशोरने आतापर्यंत भारतासाठी 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 3 डावात गोलंदाजी करताना त्याने 15.75 च्या सरासरीने 4 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्यांची इकाॅनमी 5.25 होती. आता तुर्तास त्याला कसोटी संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा-
धोनीनंतर आता युवराज सिंगवर बनणार बायोपिक, हा अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका!
नवा विश्वविक्रम! 1 ओव्हर 39 धावा, 6 षटकार; युवराज सिंगचा रेकाॅर्ड भांड्यात!
चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, स्टार खेळाडूने 48 चेंडूत ठोकल्या तब्बल 124 धावा