टी20 विश्वचषक 2024 ला 2जून पासून भारतात सुरुवात झाली आहे. टी20 विश्वचषकाच्या नवव्या अवृत्तीत भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघ 2007 साली पहिल्या अवृत्ती मध्येच विश्वविजेता ठरला होता. पण टीम इंडीया आता दुसऱ्या ट्राॅफी साठी गेली 17 वर्ष झाली झगडत आहे. त्याचप्रमाणे टीम इंडीया स्पर्धेतील दोन संघांविरुद्धचा पहिला विजय शोधत आहे. खरं तर, भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत या दोन संघा विरुद्ध अजूनही जिंकू शकलेला नाही.
टी20 विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडीया न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध एकही सामना जिंकू शकला नाही. श्रीलंकाने भारताला फायनल मध्ये मात करत 2014 साली विश्वविजेता ठरला होता. खरंतर आतापर्यंत टी20 विश्वचषकात न्यूझीलंड आणि भारतीय संघात तीन सामने झाले आहेत. त्या तीनही सामन्यात भारताला पराभवास सामोरे जावे लागले आहे. तर श्रीलंकाने दोन वेळेस भारताला हरवले आहे.
टी20 विश्वचषकस्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना 16 सप्टेंबर 2007 रोजी झाला होता. या सामन्यात किवी संघाने भारतावर 10 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर 15 मार्च 2016 रोजी टी-20 विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा सामना झाला. यावेळी न्यूझीलंडने भारतावर 47 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2021 रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषकातील तिसरा सामना झाला. यावेळी न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 गडी राखून विजय मिळवला.
टी20 विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला सामना 2010 मध्ये 11 मे रोजी झाला होता. या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडीया विरुद्ध 5 विकेट्सनी विजय मिळवला होता. यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 विश्वचषकात 2014 च्या फायनल मध्ये भिडत झाली होती. ज्यामध्ये श्रीलंकेने 6 विकेट्सनी टीम इंडीयावर मात करुन खिताब आपल्या नावे केला होता.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करणार सर्वाधिक धावा, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजानं दिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणूक निकालातही आरसीबी फॅन्सची हवा! सोशल मीडियावर कमेंट्स व्हायरल
टी20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता? जाणून घ्या कोणते संघ अजूनही ट्रॉफीपासून वंचित!