---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची मोठी झेप; जाणून घ्या सेमीफायनलचे समीकरण

---Advertisement---

भारतीय महिला संघाने महिला टी20 विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंका महिला संघाचा 82 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात खेळताना भारताने 20 षटकात 3 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19.5 षटकांत 90 धावा करून सर्वबाद झाला. या जबरदस्त विजयानंतर भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. टीम इंडिया आता पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आली आहे. ऑस्ट्रेलियन संघ 2 सामन्यात 2 विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भारताचा नेट रन रेट प्लसमध्ये आला आहे. संघाचा निव्वळ रन रेट आता +0.576 झाला आहे. जो पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा चांगला आहे.

आता भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही मोठा विजय नोंदवावा लागेल. जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तर एकूण 6 गुण होतील आणि चांगल्या नेट रनरेटच्या आधारे भारतीय संघ उपांत्य फेरीत जाऊ शकतो. मात्र त्यासाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या कोणत्याही एका संघाकडून पराभूत होणे किंवा अगदी जवळच्या फरकाने विजय मिळवणेही आवश्यक असेल. त्याचबरोबर पाकिस्तानने किमान एक सामनाही गमावला तरच टीम इंडिया उपांत्य फेरीत जाऊ शकते.

 

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला चांगल्या फरकाने पराभूत करू शकतो की नाही यावर भारतीय संघाची उपांत्य फेरीची पात्रता अवलंबून आहे. याशिवाय न्यूझीलंडला श्रीलंका किंवा पाकिस्तान यापैकी एकाने हरवले पाहिजे. जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकला आणि न्यूझीलंडने उर्वरित दोन सामनेही जिंकले तर उपांत्य फेरीचा निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल.

हेही वाचा-

सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा डंका! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा चमत्कार पहिल्यांदाच
कर्णधार सूर्यकुमार यादवने या खेळाडूला दिलं सामना जिंकण्याचं श्रेय, म्हणाला “जसे मला हवे होते…”,
‘भारताने खरा हिरा गमावला…’, रतन टाटा यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---