---Advertisement---

मोठी बातमी! बांग्लादेश टी-20 मालिकेत हा स्टार फलंदाज संघाचा भाग नसणार

On: रविवार, सप्टेंबर 15, 2024 1:29 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या कॅम्पमधून आताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे. टीम इंडियाला आगामी 19 सप्टेंबरपासून बांग्लादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळयाची आहे. त्यानंतर दोन्ही संघात 3 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. वास्तविक टी20 मालिकेसाठी उपकर्णधार शुबमन गिलला विश्रांती देण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या अहवालानुसार, आगामी बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शुबमन गिलशिवाय इतर काही महत्त्वाच्या खेळाडूंनाही विश्रांती देण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी हंगामापूर्वी खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे या खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. पण याबाबत अद्याप बीसीसीआय किंवा खेळाडूंकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

सध्याच्या मोसमात, टी 20 हे भारतीय संघासाठी सर्वात कमी प्राधान्य आहे. कारण संघाचे प्राधान्य सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहे. तसेच वर्षाआखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची मालिका तोंडावर आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवली जाणार असल्याने आगामी कसोटी सामने भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी20 मध्ये कसोटी संघातील बहुतेक खेळाडू खेळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील सामन्यांवर नजर टाकल्यास, 7 ऑक्टोबर (ग्वाल्हेर), 10 ऑक्टोबर (दिल्ली) आणि 13 ऑक्टोबर (हैदराबाद) तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अश्या परिस्थिती भारतीय कसोटी संघातील अनेक खेळाडूंना बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार आहे. ज्यामध्ये शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा सामावेश आहे. तर ईशान किशन आणि रिषभ पंत यांची टी20 मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-

बांग्लादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा किती वेळा पराभव केला? कसोटी मालिकेपूर्वी पाहा रेकॉर्ड
युवराज सिंगला त्याच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणाला पाहायचं आहे? दिग्गज क्रिकेटपटूनं स्वत: केला खुलासा
आयपीएल इतिहासातील टॉप-5 यशस्वी गोलंदाज; केवळ एकमेव वेगवान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---