---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत एकही भारतीय नाही!

On: शनिवार, ऑगस्ट 31, 2024 10:17 AM
---Advertisement---

क्रिकेट इतिहासातील पहिला एकदिवसीय सामना 54 वर्षांपूर्वी खेळला गेला होता. 5 जानेवारी 1971 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना रंगला होता. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा पहिलाच सामना होता. या जवळपास 54 वर्षांत अनेक मोठे विक्रम झाले. पण एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील टॉप-5 सर्वात यशस्वी गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या यादीत एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.

मुथय्या मुरलीधरन

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 534 विकेट आहेत. ज्यामध्ये मुथय्या मुरलीधरनची वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 30 धावांत 7 विकेट्स. मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेसाठी 1993 ते 2011 दरम्यान खेळला.

वसीम अक्रम

टाॅप-5 मध्ये पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम दुसऱ्या स्थानावर आहे. वसीम अक्रमच्या नावावर 356 एकदिवसीय सामन्यात 502 विकेट आहेत. वसीम अक्रम 1984 ते 2003 पर्यंत पाकिस्तानकडून खेळला. वसीम अक्रमची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 15 धावांत 5 बळी.

वकार युनूस

मुथय्या मुरलीधरन आणि वसीम अक्रम यांच्यानंतर वकार युनूस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या अनुभवी वेगवान गोलंदाजाच्या नावावर 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 416 विकेट्स आहेत. वकार युनूसने 1989 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2003 मध्ये पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता.

चमिंडा वास

या यादीत श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास चौथ्या क्रमांकावर आहे. चामिंडा वासच्या नावावर 322 वनडे फॉरमॅटमध्ये 400 विकेट्स आहेत. चामिंडा वासची वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 19 धावांत 8 बळी. चामिंडा वास 1993 ते 2008 या काळात वनडे फॉरमॅटमध्ये खेळला.

शाहिद आफ्रिदी

पाकिस्तानचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. शाहिद आफ्रिदीच्या नावावर 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये 395 विकेट आहेत. शाहिद आफ्रिदीची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 12 धावांत 7 बळी. शाहिद आफ्रिदी 1996 ते 2015 दरम्यान पाकिस्तानकडून एकदिवसीय फाॅरमॅट खेळला.

हेही वाचा-

भारतीय संघाला मोठा धक्का! बुची बाबू स्पर्धेत वर्ल्ड कप हिरो दुखापतग्रस्त
कसोटी क्रिकेटमध्ये खळबळ! श्रीलंकेच्या फलंदाजाची गावस्कर-ब्रॅडमन यांच्या खास क्लबमध्ये एंट्री
बांगलादेश मालिकेपूर्वी युवा फलंदाजाचं दमदार शतक, कसोटी संघासाठी ठोकला दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---