आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) क्रिकेटला फुटबॉलप्रमाणेच जगातील अधिकाधिक देशांमध्ये नेण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. 2028 ऑलिम्पिकच्या माध्यमातून, आयसीसी क्रिकेटला अशा देशांमध्ये घेऊन जाण्याची आशा करत आहे. जिथे त्याला अद्याप यश मिळाले नाही. परंतु, लॉस एंजेलिस (लॉस एंजेलिस 2028) येथे ऑलिम्पिक होण्यापूर्वी सुमारे 7 वर्षे आधीच निराश झाली. ऑलिम्पिक 2028 मधील खेळांच्या सुरुवातीच्या यादीत क्रिकेटला स्थान मिळालेले नाही, त्यामुळे क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. मात्र, आयसीसी अजूनही हार मानायला तयार नाही आणि अंतिम यादीत क्रिकेटला स्थान मिळेल, अशी आशा त्यांच्या अधिकाऱ्यांना आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) गुरुवारी 9 डिसेंबर रोजी 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी 28 खेळांची प्राथमिक यादी जाहीर केली. यात आधुनिक पेंटाथलॉन, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग यांसारख्या खेळांनाही वगळण्यात आले होते. तर स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट क्लाइंबिंग यांचा समावेश होता. टोकियो 2020 मध्ये प्रथमच स्केटबोर्डिंग आणि स्पोर्ट क्लाइंबिंगचा समावेश करण्यात आला. आयसीसीसह अनेक देशांच्या क्रिकेट बोर्डांना या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची आशा आहे, परंतु, सध्या त्यांना आयओसीकडून चांगले संकेत मिळत नाहीत.
यजमान शहर लॉस एंजेलिस 2023 मध्ये 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी अतिरिक्त खेळांचा प्रस्ताव देऊ शकते. यात क्रिकेटचा समावेश करण्याची आशा आहे. बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि अमेरिकेत लोकप्रिय असलेले अमेरिकन फुटबॉलचे आणखी एक प्रकार ऑलिम्पिक 2028 मध्ये अतिरिक्त खेळांच्या स्पर्धेत असू शकतात. लॉस एंजेलिस गेम्सच्या आयोजकांच्या प्रस्तावावर IOC 2024 मध्ये अतिरिक्त खेळांबाबत निर्णय घेईल.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या आशेने, आयसीसीने नुकतेच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्या क्रिकेट बोर्डाला 2024 च्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद दिले. अशाप्रकारे, पहिल्यांदाच अमेरिकेत आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामुळेच आयसीसीला अजूनही ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! क्रिकेट इतिहासातील अशा ४ बॅट, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद
भारतीय क्रिकेटचा युवराज घडवणारे ‘ड्रॅगन सिंग’
‘ऍशेसबद्दल काही ट्वीट का नाही केले?’ चाहत्याच्या प्रश्नावर जाफरचं मन जिंकणारं उत्तर