भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांचा आज (6 जानेवारी) 65 वा वाढदिवस आहे. कपिल देव यांचा जन्म आजच्या दिवशी 6 जानेवारी 1959 साली झाला होता. त्यांचा जन्म चंदीगड येथे झाला होता. भारताला वेगवान गोलंदाजीमध्ये प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या कपिल देव यांना हरियाणा हरिकेन्स या नावाने ओळखले जायचे.
जगातील अनेक यशस्वी अष्टपैलू खेळाडूपैकी एक कपिल देव आहेत. त्यांनी गोलंदाजीबरोबरच फलंदाजी करताना देखील बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक (1983) जिंकला होता.
वेगवान गोलंदाज बनण्यासाठी अशी मिळाली प्रेरणा
जेव्हा कपिल देव 15 वर्षाचे होते, तेव्हा त्यांना मुंबईमधील एका ट्रेनिंग कॅम्पमध्ये पाठवले होते. हा कॅम्प भारताचे भविष्यातील खेळाडू निर्माण करण्यासाठी आयोजीत केला होता. पहिल्याच दिवशी जेवणासाठी त्यांना दोन रोट्या आणि सुखी भाजी देण्यात आली होती. हे बघून कपिल देव यांनी जेवण करण्यास नकार दिला. त्यांनंतर ते कॅम्पच्या मॅनेजर के के तारापूर यांच्या रूममध्ये गेले.
कपिल देव तारापूर यांना म्हणाले, “एवढ्या जेवणाने माझे काही नाही होणार.” तारापूर जोरात हसले आणि म्हणाले, “तुला इथे येवून एक दिवसच झाला आहे आणि तक्रार करायला लागला, युनियन बनवून त्याचा लीडर पण झाला, सांग काय अडचण आहे?” कपिल देव म्हणाले, “वेगवान गोलंदाज आहे आणि एवढ्या जेवणाने माझे काही नाही होणार.”
यावर तारापूर म्हणाले” रोटी तर तुला अजून मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव भारतीय संघात 40 वर्षात कोणी वेगवान गोलंदाज जन्मला नाही.” यावर कपिल देव यांच्या डोळ्यात पाणी आले. त्याचवेळी त्यांनी ठरवले की तेच भारतीय संघाचे सर्वात वेगवान गोलंदाज होणार.
पहिल्यांदा विरोधी संघाच्या फलंदाजाने हेल्मेट मागवले
कपिल देव यांच्या अगोदर कोणताही विरोधी संघातील फलंदाज भारतीय संघासमोर फलंदाजी करताना हेल्मेट घालत नव्हता. कपिल देव यांनी 16 ऑक्टोबर 1978 साली पाकिस्तान संघाविरुद्ध फैसलाबाद येथे भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. जेव्हा कपिल देव दुसरे षटक टाकत होते, तेव्हा एक चेंडू मोहम्मद सादिक या फलंदाजाच्या नाकाजवळून गेली. कपिल देव यांच्या या चेंडूने सादिक घाबरला आणि त्याने खेळ थांबवून हेल्मेट मागवले. कपिल देव यांचा पुढचा चेंडू सादिकच्या हेल्मेटला लागून विकेटच्या चौकारसाठी गेला.
कपिल देव यांची कारकीर्द
कपिल देव यांनी आपल्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत 134 कसोटी सामन्यांत 434 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्यांनी फलंदाजीमध्ये 8 शतके करताना 5248 धावा केल्या. ते कसोटीत 400 विकेट्स आणि 5,000 धावा करणारे एकमेव खेळाडू आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या कारकीर्दीत फक्त 20 नो बॉल टाकले आहेत. कपिल देव 184 कसोटी डावात कधीच धावबाद झाले नाहीत.
त्याचबरोबर कपिल देव यांनी भारतीय संघासाठी 225 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 27.45 च्या सरासरीने 253 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्यांनी 95.07 च्या स्ट्राईक रेटने 3783 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा 200 विकेट्स प्राप्त केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बार्थोलोमेव ऑग्बेचेची हॅटट्रिक; हैदराबादचा यजमान गोवावर दणदणीत विजय, पुन्हा नंबर वन!
बापू भारी छे! पुणेकरांच्या साक्षीने षटकारांची आतिषबाजी करत अक्षरने रचला मोठा विक्रम